त्या विधानानंतर चंद्रकांत पाटलांची सारवासारव, म्हणाले जरांगे आणि मी चांगले…

मुंबईच्या आझाद मैदानात आंदोनलाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी घेतली आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. आता हे सगळं राजकीय आरक्षणासाठी चालू आहे असं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान वाद झाल्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय.

त्या विधानानंतर चंद्रकांत पाटलांची सारवासारव, म्हणाले जरांगे आणि मी चांगले...
manoj jarange patil and chandrakant patil
| Updated on: Aug 31, 2025 | 6:28 PM

Chandrakant Patil Vs Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचा मुद्दा भर पावसाळ्यात तापला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळायला हवे, अशी भूमिका मुंबईच्या आझाद मैदानात आंदोनलाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी घेतली आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. आता हे सगळं राजकीय आरक्षणासाठी चालू आहे असं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान वाद झाल्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय.

मी तज्ज्ञांशी 20 मिनिटे चर्चा केली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीकणारं आरक्षण दिलं होतं. आता मात्र पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी केली जात आहे. कायदेशीर मार्गाने मराठा आरक्षणाचा मार्ग निघायला हवा. मी कायदेशीर स्वत: कायदाविषय तज्ज्ञांशी चर्चा केली आहे. यातून काहीतरी मार्ग काढा असं मी या तज्ज्ञांना सांगितलेले आहे. मी तज्ज्ञांशी 20 मिनिटे चर्चा करून आलो आहे. या आरक्षणासाठी कायदेशीर तज्ज्ञही सकारात्मक आहेत. मराठा समाजाला न्याय मिळावा अशी आमची भूमिका असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटलांवर चांगलाच हल्लाबोल

हा सगळा लढा राजकीय आरक्षणासाठी असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यांच्या या विधानानंतर मनोज जरांगे यांनी चंद्रकांत पाटलांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. त्यामुळेच वातावरण आणखी तापू नये यासाठी मनोज जरांगे पाटील आणि मी चांगले मित्र आहोत. माझ्यात आणि त्यांच्यात भांडण लावू नका, असे म्हणत त्यांनी सारवासरव करण्याचा प्रयत्न केला.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते?

आताची सगळी धडपड ही राजकीय आरक्षणासाठी आहे. मराठा समाजाला दिलेल्या एसईबीसी आणि पूर्वीच्या ईडब्ल्यूस आरक्षणात सगळं काही होतं. फक्त राजकीय आरक्षण नव्हतं. आता ही सगळी गडबड राजकीय आरक्षणासाठी चालली आहे. आम्हाला गावचं सरपंच व्हायचं आहे, यासाठीच हे चालू आहे असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यांच्या वादानंतर आता मनोज जरांगे तसेच मराठा आंदोलक आक्रमक झाले होते.