
नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याचे एक-एक कारनामे आता समोर येत आहेत. अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरात चांगलीच खळबळ उडाली आहे. खरातची एसआयटीकडून देखील चौकशी सुरू आहे. दरम्यान त्याची मंगळवारी पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयानं त्याला आणखी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 29 मार्च पर्यंत त्याला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान त्यानंतर आता या प्रकरणावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी यावेळी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासंदर्भात देखील मोठा दावा केला आहे, हर्षवर्धन सपकाळ यांच्या या दाव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
नेमकं काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?
‘सरकारने भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री आणि दोन डझन अधिकारी जेलमध्ये जातील अशोक खरातच्या इशानेश्वर मंदिराला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने २०१८ साली १.५ कोटी रुपयांचा निधी दिला होता. फडणवीसांच्या कार्यालयात त्यावेळी कार्यरत असणारे व आता म्हाडाचे अधिकारी मिलिंद बोरीकर यांचे ही या बाबांशी अत्यंत जवळीकीचे संबंध आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही भोंदू सोबत फोटो समोर आले आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांचे ही या भोंदू खरातशी अत्यंत जवळचे संबंध होते त्यांनीही मुख्यमंत्री होण्यासाठी या बाबाकडून अघोरी पुजा केल्याची माहिती मिळते आहे. भोंदू बाबाचे कारनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सहा महिन्यांपासून माहित होते.
फडणवीसांच्या आजूबाजूचे लोक, मंत्रीमंडळातील सहकारी यांचे खरातशी संबंध असल्यानेच माहिती मिळूनही फडणवीसांनी काही कारवाई केली नव्हती. पण त्यांच्या मित्रपक्षातील सहका-यांनी देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी खरातकडून तंत्र मंत्र व अघोरी पूजा केल्यानेच फडणवीसांनी भोंदू बाबा अशोक खरात विरोधात कारवाई सुरु केली.. भोंदू बाबाच्या निमित्ताने ते आता मित्र पक्ष आणि पक्षातील हितशत्रूंना ब्लॅकमेल करत आहेत,’ असं ट्विट हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे.
सरकारने भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री आणि दोन डझन अधिकारी जेलमध्ये जातील
अशोक खरातच्या इशानेश्वर मंदिराला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने २०१८ साली १.५ कोटी रुपयांचा निधी दिला होता.
फडणवीसांच्या कार्यालयात त्यावेळी कार्यरत असणारे व आता… pic.twitter.com/bxVUo8LqOO
— Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) March 25, 2026
अशोक खरात याला पाच दिवसांची पोलीस कोठडी
दरम्यान अशोक खरात याची पोलीस कोठडी संपल्यानं त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयानं त्याला आणखी पाच दिवसांची म्हणजेच 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.