AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रयत्ने चिंचोकी घासता… लिंगपिसाट अशोक खरातवर दिग्दर्शकाची 6 शब्दांची मार्मिक पोस्ट

सध्या सोशल मीडियावर एका प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टमध्ये दिग्दर्शकाने केवळ सहा शब्द लिहिले आहेत. आता या दिग्दर्शकाची नेमकी काय पोस्ट होती चला जाणून घेऊया...

प्रयत्ने चिंचोकी घासता... लिंगपिसाट अशोक खरातवर दिग्दर्शकाची 6 शब्दांची मार्मिक पोस्ट
अशोक खरातImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 25, 2026 | 2:35 PM
Share

नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरात खळबळ माजवली आहे. महिलांचे लैंगिक शोषण करुना त्यांच्यावर बलात्कार करणे, अंधश्रद्धेचा गैरफायदा घेणे, आर्थिक फसवणूक असे गंभीर आरोप या नराधमावर आहेत. आतापर्यंत त्याच्यावर सात गुन्हे दाखल झाले असून, एका विद्यार्थिनीचा देखील छळ झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांना त्याच्या अत्याचाराचे 58 व्हिडीओ सापडले आहेत. राजकीय आणि सामाजिक बड्या नेत्यांशी त्याचे संबंध असल्याचेही उघड झाले आहे. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून सुरू असून, रोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशातच, या प्रकरणावर प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाने केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

काय आहे दिग्दर्शकाची पोस्ट?

दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी फेसबुकवर फक्त सहा शब्दांची अत्यंत मार्मिक आणि व्यंगात्मक पोस्ट केली आहे, जी तुफान व्हायरल झाली आहे. सचिन गोस्वामी यांनी पोस्ट, “प्रयत्ने चिंचोकी घासता, लाख ही मिळे…” असे म्हटले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.

याआधीही अतुल कुलकर्णीने केली होती

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे दिग्दर्शक असलेल्या सचिन गोस्वामी यांची ही एक ओळीतील पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. यापूर्वी अभिनेते अतुल कुलकर्णी यांनीही या प्रकरणावर एक पोस्ट करत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले होते. ते म्हणाले होते, “जर हे लोक पकडले गेले तरच भोंदू ठरतात, मग त्याआधी ते कोण असतात?”

काय आहे प्रकरण?

अशोक खरात प्रकरणात अजूनही अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. पोलिस तपास सुरू असून, या नराधमाच्या पूर्ण साखळीचा पर्दाफाश होण्याची अपेक्षा आहे. नाशिकच्या स्वयंघोषित ज्योतिषी आणि ‘कॅप्टन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात यांच्या लैंगिक शोषण, बलात्कार आणि इतर गंभीर आरोपांच्या प्रकरणात विशेष तपास पथक (SIT) ने तपासाला वेग दिला आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाबाबत सर्व माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ‘एकूण ८ महिलांचे ३५ व्हिडीओ समोर आले. सदर व्हिडीओत अशोक खरातने भोंदूगिरी आणि तंत्रमंत्र करून अनेक महिलांशी बलात्कार आणि अश्लील चाळे केल्याचे दिसले.’ तसेच हे व्हिडीओ खरातच्या जवळच्या व्यक्तीने देऊन गेम केल्याचे सांगितले.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?