तीन दिवसांपासून… आमदार नाराज झाल्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना अलर्ट मोडवर, मंत्र्याने सगळं सांगितलं

जळगावमध्ये एक मोठी घडामोड घडली आहे. जिल्हा बँकेत जागा न मिळाल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील हे पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. नेमकं काय घडतंय?

तीन दिवसांपासून... आमदार नाराज झाल्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना अलर्ट मोडवर, मंत्र्याने सगळं सांगितलं
Chandrakant Patil Shivsena Mla
Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 27, 2026 | 5:13 PM

किशोर पाटील टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी : मुक्ताईनगरचे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांना जिल्हा बँकेच्या महायुतीमध्ये एकही जागा मिळालेली नाही. तशी मागणी त्यांनी केलेली होती. पण त्यांना ती मिळालेली नाही. त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांनी खंत व्यक्त केली आहे. ते नाराजही झाले आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमिवर चंद्रकांत पाटील हे मोठा राजकीय भूकंप करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार चंद्रकांत पाटील हे शिवसेनेला रामराम ठोकणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते आहे. आमदार कार्यकरत्यांना विश्वासात घेऊन जिल्हाबँकेची निवडणूक पार पडल्यानंतर मोठा निर्णय घेण्याची तयारी करत असल्याची शक्यता आहे.

दुसरं म्हणजे, महायुतीकडून जिल्हाबँकेच्या संदर्भातील महायुतीचे जे मेळावे होत आहेत. त्या मेळाव्यांना आमदार चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे नाराजीचा सूर कायम आहे. त्यामुळे ते नक्कीच पक्ष सोडणार आणि भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा वाढली आहे.

Loading...

दरम्यान, या सर्व प्रकरणावर आणि शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नाराजीच्या चर्चांवर आता शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून आमदार पाटील यांची दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे यावेळी गुलाबरावांनी सांगितले.

नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?

निवडणुकीला दोन दिवस बाकी आहेत. चंद्रकांत पाटील यांची नाराजी दूर करण्याकरता जेवढे प्रयत्न करायचे आहेत तेवढे केले पण ते सर्व प्रयत्न आमचे फसलेले आहेत, साहजिकच त्यांना जागा मिळायला हवी होती मात्र सर्वच गोष्टी मनासारख्या होत नाही. जागा मिळाली नाही म्हणून त्यांचा नाराजीचा सूर असणे स्वाभाविक आहे. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करू, अशी मोठी प्रतिक्रिया आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नाराजीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते म्हणून मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे आता याप्रकरणात पुढे काय होणार याकडे लक्ष लागले आहे. स्वतः एकनाथ शिंदे यामध्ये काही मध्यस्थी करणार का असाही सवाल आता उपस्थित होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us