बाबरीचा ढाचा पाडताना शिवसैनिक होते का? चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा स्पष्ट शब्दात सांगितलं…

बाळासाहेब ठाकरेंचा अवमान करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. यावरून चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा तातडीने पत्रकार परिषद घेत आपल्या वक्तव्यावर खुलासा केला.

बाबरीचा ढाचा पाडताना शिवसैनिक होते का? चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा स्पष्ट शब्दात सांगितलं...
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 2:35 PM

मुंबई : बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिक यांची भूमिका होती की नव्हती, या विषयावरून उद्धव ठाकरे विरुद्ध भाजपमध्ये मोठा वाद रंगलाय. चंद्रकांत पाटील यांनी काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतील वक्तव्यानंतर हा वाद सुरु झालाय. बाळासाहेब ठाकरे यांनी नंतर मी जबाबदारी घेतो.. असं म्हटल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंकडून भाजपच्या धोरणांवर आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरेंचा अवमान करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. यावरून चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा तातडीने पत्रकार परिषद घेत आपल्या वक्तव्यावर खुलासा केला.

बाबरी ढाचा पडला तेव्हा…

चंद्रकांत पाटील स्पष्टीकरण देताना म्हणाले, ‘ बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत मला नेहमीच श्रद्धा आहे. त्या मुलाखतीत मी श्रद्धेने हे मांडलंय. बाळासाहेबांमुळे अनेक हिंदुत्ववादी विषयांना चालना मिळाली. मुंबई जेव्हा दंगली व्हायच्या, तेव्हा मुंबईतला हिंदु जीवंत राहिला.

विषय अयोध्येचा होता. माझ्या मनात त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त केलेत. बाबरी ढाचा पाडण्याचा म्हणजे अयोध्येत राम जन्मभूमी आहे, हे प्रस्थापित करण्याच आंदोलन ८३ पासून विश्व हिंदु परिषदेच्या नेतृत्वात सुरु झालं. बजरंग दल, दुर्गाबाईंनी केलं. दोन वेळा अशा प्रकारची अयोध्येच्या दिशेने कुच झाली. प्रत्यक्ष ढाचा पडताना, सगळे हिंदू होते. हे शिवसेनेचे… असा भेद नव्हते. हे सगळे विश्वहिंदु परिषद, बजरंग दलाच्या बॅनरखाली होते. त्यामुळे शिवसेनेचा अयोध्या ढाचा पाडण्याचा संबंध होता… तर तसं नाहीये. आनंद दिघे यांनी अयोध्या मंदिर होण्यासाठी सोन्याची वीट पाठवली होती. बाळासाहेब ठाकरे यांनी श्रेय घेतलंच होतं. चुकूनही बाळासाहेब ठाकरेंबद्दल अनादर व्यक्त करण्याचा मुद्दा नाही, असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील दिलंय

‘उद्धव ठाकरे यांना फोन करणार’

चंद्रकांत पाटील यांनी मुलाखतीत केलेल्या वक्तव्यातून गैर अर्थ निघतोय, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्षात आणून दिलं. त्यांनी चंद्रकांत पाटील यांना फोन केला. तुम्ही तत्काळ यावर पत्रकार परिषद घेऊन खुलासा करा, असं म्हटलं. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी लगोलग पत्रकार परिषद घेतली. आणि सविस्तर भूमिका मांडली, असं चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. यानंतर मी स्वतः उद्धव ठाकरे यांना फोन करून गैरसमज दूर करणार असल्याचं मोठं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलंय.

Non Stop LIVE Update
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ...
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?.
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा.