शरद पवारांची परंपरा खोटं बोलण्याची, मोदींची पवारांना कोणती ऑफर? वाचा सविस्तर

मोदींच्या भेटीत काय झालं माहिती नाही मात्र जर ऑफर दिली असेल तर एवढे दिवस सांगायला का लागले? असा सवाल चंद्रकांत पाटलांनी पवारांना विचारला आहे. तसेच तुमची परंपरा ही आतापर्यंत खोटं बोलण्याची आहे. मग तुमच्यावर विश्वास कोण ठेवणार? पळत नाही तुमची धावत जाण्याची परंपरा आहे मग तेव्हा तुम्ही का नाही गेलात? असे अनेक तिखट सवाल चंद्रकांत पाटलांनी पवारांना केले आहेत.

शरद पवारांची परंपरा खोटं बोलण्याची, मोदींची पवारांना कोणती ऑफर? वाचा सविस्तर
CHANDRAKANT PATIL AND SHARAD PAWAR
| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 4:02 PM

राज्यात सध्या तीन मोठ्या राजकीय मुद्द्यांवरून राजकारण चांगलेच गाजत आहे. त्यात नारायण राणे विरुद्ध ठाकरे संघर्षाने याची सुरूवात झाली. त्यानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमधील लेटर वॉरने वातावरण तापवले आणि आता ऐन थंडीच्या दिवसात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या ऐतिहासिक पाहटेच्या शपथविधीवरून पुन्हा राजकारणाचे निखारे पेटले आहेत. शरद पवारांनी आजपर्यंत त्यावर खुली प्रतिक्रिया दिली नव्हती, मात्र शरद पवार बोलले आणि दुसरीकडून भाजप नेतेही सुरू झाले. शरद पवारांच्या याच वक्तव्यावरून चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना काही तिखट सवाल विचारत पवारांचा इतिहासच खोटं बोलण्याचा आहे, अशी टीका केली आहे.

पवार-मोदींच्या चर्चेत काय शिजलं?

मोदींनी शरद पवारांना कोणती ऑफर दिली होती? शरद पवार आणि मोदी यांच्या चर्चेत काय शिजलं? असे चंद्रकांत पाटलांना विचारले असता, नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात काय चर्चा झाली माहिती नाही, कारण मी एक सामान्य कार्यकर्ता आहे काळाच्या ओघात हे सगळं बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी दिली आहे. त्यामुळे पवार मोदी भेटेत काय झालं कुणी कुणाला काय ऑफर दिली? हे मात्र उद्याप कोणीही सांगताना दिसून येत नाही.

ऑफर सांगायला एवढे दिवस का लागले?

मोदींच्या भेटीत काय झालं माहिती नाही मात्र जर ऑफर दिली असेल तर एवढे दिवस सांगायला का लागले? असा सवाल चंद्रकांत पाटलांनी पवारांना विचारला आहे. तसेच तुमची परंपरा ही आतापर्यंत खोटं बोलण्याची आहे. मग तुमच्यावर विश्वास कोण ठेवणार? पळत नाही तुमची धावत जाण्याची परंपरा आहे मग तेव्हा तुम्ही का नाही गेलात? असे अनेक तिखट सवाल चंद्रकांत पाटलांनी पवारांना केले आहेत. शरद पवार कधी काय करतील याचा अंदाज एवढ्या वर्षात राजकारण्यांनाच काय राज्यातल्या जनतेलाही लागला नाही, त्यामुळे पवारांनी आत्ता टाकलेल्या गुगलीमागील कारण काय? हे येणारा काळच सांगेल, मात्र सध्या तरी यावरून ऐन थंडीच्या दिवसात राजकारण तापलंय.

Sugarcane Sludge : ऊसाचे गाळप कासवगतीने, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा पाथरी येथे रास्तारोको

Liger | ‘लायगर’ चित्रपट साऊथ स्टार विजय देवरकोंडासाठी बॉलिवूडची कवाडं खुली करणार! अनन्या पांडेही महत्वाच्या भूमिकेत दिसणार

Mumbai Crime | 12 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार, मुंबईत चर्चच्या पाद्रीला जन्मठेप