AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime | 12 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार, मुंबईत चर्चच्या पाद्रीला जन्मठेप

नोव्हेंबर 2015 मधील घटनेनंतर मुलगा घरी आल्यावर रक्तस्राव होत असल्याचं त्याच्या आईने पाहिलं. तिने विचारणा केल्यावर मुलाने अत्याचाराबद्दल सांगितलं. त्यानंतर पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला होता.

Mumbai Crime | 12 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार, मुंबईत चर्चच्या पाद्रीला जन्मठेप
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 3:48 PM
Share

मुंबई : 12 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याच्या सहा वर्षांनंतर मुंबईतील चर्चच्या पाद्रीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने बुधवारी आरोपीला शिक्षा सुनावली.

57 वर्षीय पाद्री उत्तेजित पेनिट्रेटिव्ह लैंगिक अत्याचार (aggravated penetrative sexual assault) आणि लैंगिक छळ केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत दोषी आढळला होता. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पीडित मुलाला भरपाई देण्याचे निर्देश विशेष न्यायाधीश सीमा जाधव यांनी दिले.

सहा वर्षांपूर्वी लैंगिक अत्याचार

पीडित मुलगा आणि त्याच्या पालकांसह नऊ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. विशेष सरकारी वकील वीणा शेलार यांनी कोर्टाला सांगितले की वैद्यकीय पुराव्याने मुलाच्या साक्षीला पुष्टी दिली. ऑगस्ट आणि नोव्हेंबर 2015 अशा दोन वेळा आपल्यावर अत्याचार झाल्याचा आरोप अल्पवयीन मुलाने केला होता.

अत्याचारानंतर चिमुरड्याला धमकी

27 नोव्हेंबर 2015 रोजी 12 वर्षीय पीडित मुलगा त्याच्या धाकट्या भावासोबत चर्चमध्ये गेला होता. पाद्रीने त्याला चर्चमधील डेकोरेशन काढण्यास सांगितलं. धाकट्या भावाला गेटबाहेरील डेकोरेशन काढण्यास सांगितलं होतं. आरोपीने आपला पाठलाग केला आणि लैंगिक अत्याचार केला, असा दावा पीडित मुलाने केला होता. तर ऑगस्ट 2015 मध्येही अशाच प्रकारे पाद्रीने आपल्यावर अत्याचार केला होता, असं त्याने सांगितलं. या प्रकाराची वाच्यता केल्यास शरीराचे लहान लहान तुकडे करण्याची धमकी आरोपीने दिल्याचंही मुलाने सांगितलं.

नोव्हेंबर महिन्यातील घटनेनंतर मुलगा घरी आल्यावर रक्तस्राव होत असल्याचं त्याच्या आईने पाहिलं. तिने विचारणा केल्यावर मुलाने अत्याचाराबद्दल सांगितलं. त्यानंतर पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला होता.

पीडित मुलाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याची माहिती आरोपीला होती, त्यामुळे त्याने या गोष्टीचा गैरफायदा घेतला, असा युक्तिवाद वकिलांनी केला. आरोपी हा एका धार्मिक संस्थेचा प्रमुख आहे, या घटनेमुळे मुलगा भयभीत झाला होता, याकडेही वकिलांनी लक्ष वेधले.

संबंधित बातम्या :

रस्त्यात गाडी बंद पडल्याचे निमित्त, मदत करणाऱ्यानं जाळ्यातच ओढलं, सुरू झाला अत्याचाराचा सिलसिला!

गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांचे वेशांतर, अखेर सोनसाखळी चोराच्या मुसक्या आवळल्या

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.