AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इथे पालकमंत्र्यांकडून बेड वाढवण्याची घोषणा, तिथे चंद्रपुरात बेडअभावी रुग्णाने गाडीत प्राण सोडले

चंद्रपूर शहरातील मुख्य शासकीय कोव्हिड रुग्णालयासमोर 51 वर्षीय मनोहर डांगे यांचा स्वतःच्या गाडीतच मृत्यू झाला. (Chandrapur Corona Patient dies car )

इथे पालकमंत्र्यांकडून बेड वाढवण्याची घोषणा, तिथे चंद्रपुरात बेडअभावी रुग्णाने गाडीत प्राण सोडले
Corona Virus
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Apr 21, 2021 | 9:27 AM
Share

चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये शेकडो बेड्सची उपलब्धता होणार हे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे पत्रकार परिषदेतील शब्द विरतात न विरतात, तोच पुन्हा एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा गाडीत मृत्यू झाला. शासकीय कोव्हिड रुग्णालयासमोर स्वतःच्या गाडीतच त्याला प्राण गमवावे लागले. शासकीय आणि खासगी रुग्णालयात दिवसभर बेडसाठी फिरुनही कुठेच बेड न मिळाल्याने उपचाराअभावी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. थेट शासकीय कोव्हिड रुग्णालयासमोर कोरोना बाधितांचे लागोपाठ होणारे मृत्यू जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे धक्कादायक चित्र उघड करत आहेत. (Chandrapur Corona Patient dies again in own car after fails to get bed in hospital)

चंद्रपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी कोरोना उपाययोजना संदर्भात मोठी आढावा बैठक घेतली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेतील वडेट्टीवार यांनी शेकडो बेड्सची उपलब्धता होणार असल्याचं आश्वासनही दिलं. मात्र त्यांचे शब्द विरतात, तोच पुन्हा एका रुग्णाचा गाडीत मृत्यू झाला.

चंद्रपूर शहरातील मुख्य शासकीय कोव्हिड रुग्णालयासमोर 51 वर्षीय मनोहर डांगे यांचा स्वतःच्या गाडीतच मृत्यू झाला. शासकीय किंवा खासगी रुग्णालयात डांगे यांचे नातेवाईक दिवसभर बेडसाठी फिरले. पर्याय संपल्यावर अखेर शासकीय कोव्हिड रुग्णालयासमोर उपचाराच्या प्रतीक्षेत त्यांनी गाडी लावली. मात्र वेळीच उपचार न मिळाल्याने डांगेंचा मृत्यू झाला. त्यांची अँटिजेन चाचणी निगेटिव्ह आली, मात्र RTPCR अहवाल येण्यासाठी तीन दिवस लागले होते.

लागोपाठ दोन दिवस चंद्रपुरात बेडअभावी मृत्यू

चंद्रपूरमध्ये राहणाऱ्या 40 वर्षीय प्रविण दुर्गे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दोन दिवसांपूर्वी (सोमवार 19 एप्रिल) प्रकृती बिघडल्यानंतर ते नातेवाईकांसह रुग्णालयात फिरत होते. उपचार आणि बेड मिळावा यासाठी ते अनेक रुग्णालयांमध्ये फेऱ्या मारत होते. अखेरपर्यंत प्रवीण दुर्गे यांना कुठेही उपचार किंवा बेडची सुविधा मिळाली नाही. शेवटी पहाटे आपल्या अल्टो गाडीतच त्यांचा मृत्यू झाला.

दुसरीकडे,  उपचार न मिळाल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात बस स्थानकावरच रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली होती. ब्रम्हपुरी शहरातील गोविंदा निकेश्वर (50) यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी  उपचारासाठी रुग्णालयात भरती होण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांना जिल्ह्यातील आंभोरा येथून ब्रम्हपुरी येथील कोविड रुग्णालयात आणण्यात आले. मात्र तिथेही बेड शिल्लक नव्हते. वणवण करुनही त्यांना उपचारासाठी बेड मिळाला नाही. (Chandrapur Corona Patient dies car )

शेवटी बसस्थानकावर प्राण सोडला

दिवसभर चकरा मारुनही गोविंदा निकेश्वर यांना उपचारासाठी कोणत्याही रुग्णालयाने भरती करुन घेतले नाही. बेड शिल्लक नसल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यास नकार देण्यात आला. शेवटी रात्र होत असल्यामुळे निकेश्वर हे ख्रिस्तानंद रुग्णालयासमोर असलेल्या बस स्टॉपवर गेले. तिथे त्यांनी आसरा घेतला. मात्र उपचाराविना त्यांचा पत्नीसमोर स्टॉपवरच मृत्यू झाला.

थेट शासकीय कोव्हिड रुग्णालयासमोर स्वतःच्या वाहनात किंवा रुग्णवाहिकेत कोरोनाबाधितांचे लागोपाठ होणारे मृत्यू जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे धक्कादायक चित्र मांडत असल्याची टीका होत आहे.

संबंधित बातम्या :

शेवटच्या श्वासापर्यंत बेडसाठी वणवण, शेवटी बसस्थानकात पत्नीसमोर प्राण सोडला

रुग्णालयात फेऱ्या मारुनही बेड मिळाला नाही, चंद्रपुरात रुग्णाचा स्वतःच्या गाडीतच मृत्यू

(Chandrapur Corona Patient dies again in own car after fails to get bed in hospital)

Follow Us
विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर उईके संतापले
साप चावल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मंत्री उईके संतापले
मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ
Tardeo Estate Agent | मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ, नेमकं प्रकरण काय?
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार