AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाचा विद्रूप चेहरा ! शेवटच्या श्वासापर्यंत बेडसाठी वणवण, शेवटी बसस्थानकात पत्नीसमोर प्राण सोडला

चंद्रपूर जिल्ह्यात एक हेलावून टाकणारी घटना घडली आहे. येथे ब्रम्हपुरी येथे एका कोरोनाग्रस्ताचा उपचार न मिळाल्यामुळे बसस्थानकावरच मृत्यू झाला आहे. (maharashtra chandrapur corona patient)

कोरोनाचा विद्रूप चेहरा ! शेवटच्या श्वासापर्यंत बेडसाठी वणवण, शेवटी बसस्थानकात पत्नीसमोर प्राण सोडला
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्ताने अशा प्रकारे बसस्थानकावर अखेरचा श्वास घेतला.
| Updated on: Apr 18, 2021 | 10:21 PM
Share

चंद्रपूर : राज्यात कोरोनी दुसरी लाट आल्यामुळे परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. रोज हजारो रुग्ण आढळत आहे. मृत्यूदरसुद्धा वाढला असून रोज शेकडो लोकांचा राज्यात मृत्यू होत आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी राज्य सरकारने संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली आहे. मात्र, तरीसुद्धा कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नाहीये. रोज 50 हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. रुग्ण वाढल्यामुळे राज्यात आरोग्य सुविधा तोकडी पडत आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात एक हेलावून टाकणारी घटना घडली आहे. जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे एका कोरोनाग्रस्ताचा उपचार न मिळाल्यामुळे बसस्थानकावरच मृत्यू झाला आहे. बसस्थानकावरच या रुग्णाने तडफडून प्राण सोडला आहे. शनिवारी (17 एप्रिल) संध्याकाळी हा संतापजनक प्रकार घडला. (Maharashtra Chandrapur Corona positive patient died in bus stop)

दिवसभर वणवण पण बेड मिळाला नाही

मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदा निकेश्वर (50) यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी स्वत:च्या उपचारासाठी रुग्णालयात भरती होण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांना जिल्ह्यातील आंभोरा येथून ब्रम्हपुरी येथील कोविड रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, येथेसुद्धा बेड शिल्लक नव्हते. शेवटी वणवण फिरूनही त्यांना उपचारासाठी बेड मिळाला नाही.

शेवटी बसस्थानकावर प्राण सोडला

दिवसभर वणवण करुनही गोविंदा निकेश्वर यांना उपचारासाठी कोणत्याही रुग्णालयाने भरती करुन घेतले नाही. बेड शिल्लक नसल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यास नकार देण्यात आला. शेवटी रात्र होत असल्यामुळे निकेश्वर हे ख्रिस्तानंद रुग्णालयासमोर असलेल्या बस स्टॉपवर गेले. तेथे त्यांनी आसरा घेतला. मात्र, तेथेच त्यांचा उपचारावीना मृत्यू झाला.

दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुरेसे मनुष्यबळ नसणे, औषधांचा, ऑक्सिजनचा तुटवडा, तसेच बेड उपलब्ध नसल्यामुळे शेकडो कोरोनाग्रस्तांचा उपचारावीना मृत्यू होत आहे. हा प्रकार राज्यात सर्वत्र घडत असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. तसेच राज्याचे आपत्ती व्यवस्थापनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघातच हा प्रकार घडल्यामुळे राज्य सरकारवर सर्वत्र टीका होत आहे.

इतर बातम्या :

Corona Cases and Lockdown News LIVE : वाशिममध्ये दिवसभरात 6 जणांचा मृत्यू 474 नवे रुग्ण

फडणवीसांनी पोलिसांवर दबाव टाकला, सरकारी कामात हस्तक्षेप; दिलीप वळसे-पाटलांनी दिले कारवाईचे संकेत

‘लस’स्वी व्हा आणि 5 हजाराचं बक्षीस जिंका, लसीकरणासाठी सरकारची नामी शक्कल

(Maharashtra Chandrapur Corona positive patient died in bus stop)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.