AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीसांनी पोलिसांवर दबाव टाकला, सरकारी कामात हस्तक्षेप; दिलीप वळसे-पाटलांनी दिले कारवाईचे संकेत

ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकला. (dilip walse patil first reaction on bruck pharma company issue)

फडणवीसांनी पोलिसांवर दबाव टाकला, सरकारी कामात हस्तक्षेप; दिलीप वळसे-पाटलांनी दिले कारवाईचे संकेत
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
| Updated on: Apr 18, 2021 | 6:06 PM
Share

मुंबई: ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकला. हा सरकारी कामातील हस्तक्षेप असून त्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय सहकाऱ्यांशी चर्चा करून घेऊ, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत. (dilip walse patil first reaction on bruck pharma company issue)

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज मीडियाशी संवाद साधताना हे संकेत दिले. राज्यात 50 हजार रेमडेसिवीरचा साठा येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पुरवठादाराकडे लसीचा पुरवठा करण्याचं पत्रं असल्याचं पोलिसांना माहीत नव्हतं. सुरुवातीला पुरवठादाराने ते पत्रं दाखवलंही नव्हतं. त्यामुळे पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, ही चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे काही सहकाऱ्यांसह पोलीस ठाण्यात पोहोचले. फडणवीसांनी पोलिसांवर दबाव टाकला. शासकीय कामात हस्तक्षेप करण्यात आला. त्यामुळे चौकशीत बाधा आली आहे. या गोष्टी योग्य नाहीत आणि पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाही, असा इशारा वळसे-पाटील यांनी दिला आहे.

पोलीस कुणचाीही चौकशी करू शकतात

यावेळी ब्रुक फार्माच्या मालकाला का बोलावलं? कशासाठी बोलावलं? असा सवाल करण्यात आला. पोलिसांना कुणालाही बोलावण्याचा अधिकार आहे. कुणाचीही चौकशी करू शकतात. त्यामुळे पोलिसांनी ब्रुक फार्माच्या मालकाला बोलावलं होतं, असं त्यांनी सांगितलं.

साठा कुणाला देणार होते? चौकशी करणार

फडणवीस आणि दरेकरांवर गुन्हा दाखल करणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर या संदर्भात माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. याबाबत चौकशी करूनच निर्णय घेऊ, असं त्यांनी स्पष्ट केलं. हा साठा सरकारला देण्यात येणार नव्हता. खासगी पार्टीला हा साठा देण्यात येणार होता. एफडीएने लसीचा पुरवठा करण्याची विनंती ब्रुकच्या मालकाला केली होती. त्यावर त्याने असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे हा साठा कुणाकडे जाणार होता, याची चौकशी करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, हा साठा पोलिसांनी जप्त केलेला नाही. हा साठ कंपनीकडेच असून त्याचा वेगळा वापर करणार आहेत की नाही याची चौकशी करण्यात येईल. या कंपनीकडे अधिक साठा असण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

पुन्हा चौकशी करू

फडणवीस यांनी दबाव टाकल्याने ब्रुकच्या मालकाला सोडण्यात आलेलं नाही. तर त्याने परवानगीचं पत्रं दाखवल्याने सोडण्यात आलं आहे. त्याला चौकशीसाठी पुन्हा बोलावू असं पोलिसांनी सांगितलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली. कुणा मंत्र्याचंया ओएसडीने धमकी दिल्याचं मला माहीत नाही, असंही ते म्हणाले. (dilip walse patil first reaction on bruck pharma company issue)

संबंधित बातम्या:

ज्या कंपनीच्या मालकासाठी फडणवीस अर्ध्या रात्री पोलीस ठाण्यात गेले ती नेमकी कुणाची?, नेमका वाद काय आहे?; वाचा सविस्तर

VIDEO: ‘त्या’ कंपनीच्या मालकासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते इतक्या तातडीने पोलीस ठाण्यात का गेले?

फार्मा कंपनीकडे रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा मोठा साठा? मुंबई पोलिसांनी मालकाला घेतले ताब्यात; फडणवीस पोहोचले पोलीस ठाण्यात

महाराष्ट्र सरकारला 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन, भाजपची गुजरातमधून मोठी घोषणा

(dilip walse patil first reaction on bruck pharma company issue)

राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का
राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का.
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद.
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल.
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?.
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.