‘लस’स्वी व्हा आणि 5 हजाराचं बक्षीस जिंका, लसीकरणासाठी सरकारची नामी शक्कल

तुम्ही Covid-19 वरील लस घेतली असेल किंवा लवकरच घेणार असाल तर तुम्हाला 5000 रुपयांचे बक्षीस मिळवण्याची संधी आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:44 PM, 18 Apr 2021
'लस'स्वी व्हा आणि 5 हजाराचं बक्षीस जिंका, लसीकरणासाठी सरकारची नामी शक्कल
Corona Vaccination

मुंबई : राज्यासह देशातील कोरोनाची (Corona Pandemic) स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. सध्या महाराष्ट्रात रोज 60 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत आहे. त्यामुळे कोरोनावरील लसीकरणाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न होतोय. सध्या देशात 45 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस दिली जात आहे. तुम्हीदेखील Covid-19 वरील लस घेतली असेल, किंवा लवकरच घेणार असाल तर तुम्हाला 5000 रुपयांचे बक्षीस मिळवण्याची संधी आहे. यासाठी लस घेताना तुम्हाला फक्त एक फोटो क्लिक करावा लागेल आणि तो फोटो पोस्ट केल्यानंतर तुम्हाला 5 हजार रुपयांचे बक्षीस मिळू शकेल. हे बक्षीस सरकारकडून दिलं जात आहे. (Share Covid-19 Vaccination selfie of Anyone in your Family including yourself along with a Tagline and Get 5000 RS as Reward)

My Gov कडून लसीकरणाला चालना देण्यासाठी एक मोहीम राबवली जात आहे. याअंतर्गत, एखादी व्यक्ती स्वतःचा किंवा आपल्या कुटूंबाचा लस घेतल्याचा फोटो शेअर करत असेल आणि त्यासोबत त्याने एक चांगली टॅगलाइन दिली तर त्याला सरकारकडून 5000 रुपये जिंकण्याची संधी मिळू शकते.

My Gov च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्याला कोरोनावरील लस दिल्यानंतर लसीकरणादरम्यानचा फोटो एका चांगल्या टॅगलाईनसह शेअर करा. या टॅगलाइनमध्ये लोकांना लसीकरणासाठी प्रेरणा द्या किंवा लसीकरणाचं महत्त्व पटवून द्या. दर महिन्याला 10 उत्कृष्ट फोटोंना (टॅगलाईनसह) प्रत्येकी 5-5 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

लसीकरणादरम्यानचा फोटो हवा

ही मोहीम 31 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. तुम्हाला यात सहभागी व्हायचं असेल तर फोटो पोस्ट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, हा फोटो लस घेताना क्लिक करायचा आहे. यादरम्यान, तुम्हाला कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करावे लागेल. ज्यामध्ये मास्क असायलाच हवा.

लसीकरणासाठी नोंदणी करा

तुम्हालादेखील ही लस घ्यायची असल्यास, यासाठी तुम्ही http://cowin.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अॅडव्हान्स अपॉईंटमेंट घेऊ शकता आणि लसीकरणासाठी साइटवरही नोंदणी करू शकता. या व्यतिरिक्त आपण COWIN पोर्टल किंवा आरोग्य सेतु अ‍ॅपवर नोंदणी किंवा अपॉइंटमेंट बुक करू शकता.

संबंधित बातम्या

Corona Cases and Lockdown News LIVE : महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात तब्बल 67 हजार 123 नवे रुग्ण, 419 रुग्णांचा मृत्यू

Maharashtra Lockdown Update | ‘मुख्यमंत्री काही दिवस परिस्थिती पाहतील, नंतर लॉकडाऊनवर निर्णय’; मंत्र्याचे मोठे वक्तव्य

(Share Covid-19 Vaccination selfie of Anyone in your Family including yourself along with a Tagline and Get 5000 RS as Reward)