ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा! गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा गेमचेंजर निर्णय, थेट…

ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा गेमचेंजर निर्णय घेतला आहे.

ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा! गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा गेमचेंजर निर्णय, थेट...
Image Credit source: tv9
| Updated on: Nov 21, 2026 | 9:54 AM

ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळणारी बातमी हाती आली आहे. कार्तिकी एकादशीच्या महापर्वावर गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे.  गोशाळेसाठी जमीन खरेदी, दानपत्र, भाडेकरार करताना यापुढे व्यावसायिक दर लावण्यावर बंदी घातली आहे. गोशाळेसंदर्भातील नोंदणी व्यवहार कृषी दरानेच होणार आहे. याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आदेश दिले आहेत. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  गोशाळेतून सेवाभाव जपला जातो. भटक्या, आजारी, वृद्ध, अपघातग्रस्त गोवंशाचे संगोपन होते. देशी गोवंशाच्या जतनासह चारा लागवड होत असल्याने गोशाळा व्यावसायिक दरातून वगळण्याचा  निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला.

Loading...

काय फायदा होणार?

महाराष्ट्र गोशाळांसाठी जमीन खरेदी, भाडेपट्टा किंवा देणगी यांसारख्या नोंदणी व्यवहारांवर व्यावसायिक दराऐवजी सवलतीचे कृषी दर लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय. यामुळे गोशाळा उभारणाऱ्या आणि चालवणाऱ्या संस्थांचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. यापूर्वी अनेकदा संस्था किंवा ट्रस्टच्या नावावर जमीन घेताना व्यावसायिक किंवा बिनशेती दराने मुद्रांक शुल्क आकारले जायचे. आता कृषी जमिनीच्या दराने म्हणजे ग्रामीण भागात साधारण ३% ते ४% आकारले जाईल, असे स्पष्ट निर्देश महसूल विभागाने दिले आहेत. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांना गोशाळांच्या जमिनीच्या दस्तांची नोंदणी कृषी मूल्यांकनानुसार करण्याचे आदेश दिलेत. निर्णयाने गोवंश संवर्धनाला प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच कमी खर्चात कायदेशीर दस्तऐवज पूर्ण करता येत असल्यामुळे नवीन गोशाळा सुरू करणाऱ्या संस्थांना व ट्रस्टला मोठा दिलासा मिळालाय. याबाबत महसूल विभागाने परिपत्रक जारी केलं आहे.

गोशाळा नोंदणी कशी करावी? 

गोशाळा नोंदणीसाठी कागदपत्रांच्या यादीमध्ये नमूद केलेले कागदपत्रच जोडणे आवश्यक आहे. इतर कोणतेही जास्तीचे दस्तावेज जोडू नये. त्याचबरोबर पशुचा अनुक्रमांक मध्ये १ ते १० या प्रमाणे टाकावयाचे आहे. जमीन संस्थेच्या मालकीची नसल्यास भाडेपट्टा करार जोडणे अनिवार्य असणार आहे. तसेच पशुधनाविषयक माहिती भरणे अनिवार्य आहे. स्थावर व जंगम मालमत्ता विषयक माहिती भरतांना संस्थेकडे ज्या बाबी आहेत. त्याची माहिती, मूल्य नमूद करावं. मागील तीन वर्षाचे एकूण उत्पन्न व खर्चाची माहिती द्यावी. या नोंदणीसाठी राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे बंधनकारक आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us