Ashok Kharat : अशोक खरातसोबतच्या फोटोने खळबळ, चंद्रकांत पाटलांचा राजीनामा मागणाऱ्या धंगेकरांना भाजपाचे प्रत्युत्तर!

खरातचे पाय धरणारे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबाबतीत वेगळा न्याय का, असा चोख सवाल धंगेकरांनी उपस्थित केलाय.

Ashok Kharat : अशोक खरातसोबतच्या फोटोने खळबळ, चंद्रकांत पाटलांचा राजीनामा मागणाऱ्या धंगेकरांना भाजपाचे प्रत्युत्तर!
ashok kharat and chandrashekhar bawankule
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 23, 2026 | 4:56 PM

Ashok Kharat And Chandrakant Patil : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली. त्याने अनेक महिलांचे शोषण केल्याचे समोर आले असून सध्या खरात हा तुरुंगात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचे आणि अशोक खरात यांचे वेगवेगळ्या कार्यक्रमातील फोटो व्हायरल झाल्याने या प्रकरणाला राजकीय वळणही मिळाले. रुपाली चाकणकर यांच्यावर वेगवेगळे आरोप झाल्यानंतर त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. दरम्यान, आता शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांचा अशोक खरातसोबतचा फोटो बाहेर काढून खळबळ उडवून दिलीय. त्यांनी चंद्रकांत पाटील यांचाही राजीनामा घ्यावा, अशी मागणी केलीय. धंगेकरांच्या याच मागणीवर आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिलीय.

चंद्रकांत दादा संस्कारमय जीवन जगले

धंगेकर हे रोज कोणत्याही विषयावर राजकीय टीका करतात. चंद्रकांत दादांनी धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमात आपलं जीवन वाहून घेतलेलं आहे. चंद्रकांत दादा संस्कारमय जीवन जगले. दादांच्या आयुष्याचा अभ्यास केला तर धंगेकर टीका करणार नाहीत, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

Loading...

धंगेकरांनी नेमका काय आरोप केला?

धंगेकरांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर अशोक खरात आणि चंद्रकांत पाटील यांचा एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोमध्ये चंद्रकांत पाटील अशोक खरातच्या पाया पडत असल्याचे दिसतेय. याच फोटोचा आधार घेत, ‘खरात प्रकरणात खरातसाठी छत्री धरल्यामुळे रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले, मग खरातचे पाय धरणारे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबाबतीत वेगळा न्याय का,’ असा चोख सवाल धंगेकरांनी उपस्थित केलाय.

सोबतच, देवेंद्रजी, न्यायाची भूमिका घेताना व्यक्ती पाहून निर्णय होऊ नये. रूपाली चाकणकर यांच्याबाबतीत जो निकष लावला, तोच चंद्रकांतदादा पाटील यांच्याबाबतीतही लावला पाहिजे, अशी आशाही धंगेकरांनी व्यक्त केली. चंद्रकांतदादांसाठी खरात बाबाने वेगळा टेबल मांडला होता का? असा सवालही धंगेकरांनी केलाय. त्यामुळे आता हे प्रकरण आगामी काही दिवसांत पेटणार की यावर पडदा पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us