देवेंद्र फडणवीसांच्या वाट्याला गेलात तर… चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक, रोहित पवारांना निर्वाणीचा इशारा

chandrashekhar bawankule warns rohit pawar : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्याबाबत टीका केल्यास आता सहन केलं जाणार नाही, असा इशारा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. काही जण राज्यात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यानी रोहित पवारांना मोठा इशाराच दिला आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या वाट्याला गेलात तर... चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक, रोहित पवारांना निर्वाणीचा इशारा
Chandrashekhar Bawankule On rohit pawar
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 18, 2026 | 9:38 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोहित पवारांना देवेंद्र फडणवीस यांच्या वाट्याला न जाण्याचा सल्ला दिला. तसंच रोहित पवारांनी राज्याची आणि फडणवीसांची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.

रोहित पवारांनी दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसच मफलरमॅन असल्याचं म्हटलं होतं. त्यांचा आणि व्हिएसआर कंपनीचे रोहित सिंग यांचा फोटो त्यांनी पत्रकार परिषदेतून समोर आणला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं की, अजित पवारांचा विमान अपघात घडवण्यामागे फडणवीसांचा हात आहे, असं म्हणत नाही, पण त्या विमान कंपनीचे मालक आणि फडणवीसांमधील संबंध चांगले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून तपास यंत्रणांच्या माध्यमातून तपासाची कारवाई योग्यप्रकारे पार पडेल की नाही, याबाबत शंका येते, असं म्हटलं होतं.

Loading...

दरम्यान, यावेळी बावनकुळेंनी रोहित पवारांना चिमटा काढला. सुप्रिया सुळे यांनी केलेलं वक्तव्य योग्य असल्याचं सांगत बावनकुळे यांनी रोहित पवारांना शरद पवारांनी दिलेले संस्कार पाळण्याचा सल्ला दिला. ‘रोहित पवार जे करु पाहत आहे ते त्यांनी करु नये. ते राज्याच्या हिताचं नाही. रोहित पवारांनी फडणवीसांची माफी मागितली पाहिजे. सुप्रीया सुळेंनी केलेलं वक्तव्य योग्य आहे. शरद पवारांचे संस्कार रोहित पवारांनी पाळले पाहिजे, फडणवीस यांनी विकासाच्या राजकारणात पक्ष आणले नाही किंवा गटबाजी केली नाही ‘देवेंद्र फडणवीस यांच्या वाट्याला जाऊ नका, त्याचे परिणाम वाईट होतील. ही धमकी नाही,’ असं ते म्हणाले.

बाळासाहेबांचा फोटो प्रकरणावर काय म्हणाले?

शायना एनसी यांच्यकडून बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडण्याच्या प्रकरणावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय घडलं, याची आपल्याला माहिती नसल्याचं सांगत त्यांनी शायना एनसी यांची बाजू मांडली. त्या प्रगल्भ आणि हिंदुत्ववादी नेत्या असून त्यांचा स्वभाव असा नसल्याचं बावनकुळे म्हणाले.

‘अनावधानाने घडलं असेल. माझ्याकडूनही कधी कधी अनावधानाने घडतं. त्यांची गल्लत झाली असेल. आमच्या बहिणीच्या हातून काही झालं असेल तर त्याला माफ करता येतं,’ असं बावनकुळे यांनी म्हटलं. या प्रकरणात शायना एनसी यांना सोडून दिलं पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us