Sunetra Pawar : तर भविष्यात आम्ही…तुम्ही जर…’गुंगी गुडिया’वरून भुजबळांचा संताप; काँग्रेस टार्गेटवर; राजकारण तापणार?
आमच्या पक्षाचे लोक काँग्रेसच्या कार्यालयात गेले. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला. यापुढे मात्र एक लक्षात ठेवावं. तुम्ही जर आमच्या नेत्यांबाबत असं काही बोलत असाल तर भविष्यात आमचे लोक गप्प बसरणार नाहीत, असा इशाराच भुजबळ यांनी दिला.

Sunetra Pawar : काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा गुंगी गुडिया असा उल्लेख केला आहे. काँग्रेसच्या या उल्लेखानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी काँग्रेसविरोधात आंदोलन केले जात आहे. काँग्रेसने आपले विधान मागे घ्यावे, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, आता मंत्री छगन भुजबळ यांनी काँग्रेसवर संताप व्यक्त करत थेट इशाराच देऊन टाकला आहे. हे असंच चालू राहिलं तर आम्ही शांत बसणार नाही, असा रोखठोक इशाराच भुजबळ यांनी दिला आहे. काँग्रेसचं हे विधान अश्लाघ्य स्वरुपाचं आहे, असंही ते म्हणाले.
महिलेबाबत असं बोलणं हे अतिशय अश्लाघ्य
नुसतं बोलत राहिलो म्हणजे फार काम केलं असं होत नाही. एखाद्या व्यक्तीला थोडासा वेळ द्यायलाच लागतो. तो वेळ तुम्ही देणार की नाही? असाच प्रसंग माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबत घडला होता. तेव्हा आम्हाला त्याचं वाईट वाटलं होतं. हर्षवर्धन सपकाळ यांना ते वाईट वाटलं होतं की नाही ते आम्हाला माहिती नाही, अशी बोचरी टीका भुजबळ यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर केली. तसेच राहुल गांधी यांच्यापासून इतर नेते महिलांबाबत चांगले बोलत असतात. आता पहिल्यांदाच एक महिला महाराष्ट्रासारख्या राज्यात उमुख्यमंत्रिपदावर आहे. अशा महिलेबाबत असं बोलणं हे अतिशय अश्लाघ्य असं आहे. आम्हाला काँग्रेसकडून अशी अपेक्षा नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
तुम्ही जर आमच्या नेत्यांबाबत असं…
आमच्या पक्षाचे लोक काँग्रेसच्या कार्यालयात गेले. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला. यापुढे मात्र एक लक्षात ठेवावं. तुम्ही जर आमच्या नेत्यांबाबत असं काही बोलत असाल तर भविष्यात आमचे लोक गप्प बसरणार नाहीत. आमचे लोक ऐकून घेतील असं नाही. आम्ही जाब विचारणार, असा थेट इशाराच भुजबळ यांनी दिला.
पुढच्या काळात त्या त्यांचं कर्तृत्त्व…
विशेष म्हणजे, शेवटी बोलताना काँग्रेस आणि आमचा काही संबंध नाही. कशासाठी अपमान केला जातोय. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ काहीही बोलत आहेत. सुनेत्रा ताई या उपमुख्यमंत्री आहेत. पुढच्या काळात त्या त्यांचं कर्तृत्त्व नक्कीच सिद्ध करून दाखवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.