छगन भुजबळ, वळसे पाटील आणि अमोल कोल्हे एकाच मंचावर, शरद पवारांची अनुपस्थिती..

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेला विराम मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आज ओतूरमध्ये राज्यव्यापी सत्यशोधक समाजाचं अधिवेशन होतंय. यादरम्यान छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील एकाच मंचावर येणार आहेत.

छगन भुजबळ, वळसे पाटील आणि अमोल कोल्हे एकाच मंचावर, शरद पवारांची अनुपस्थिती..
Chhagan Bhujbal, Dilip Walse Patil, Sharad Pawar
| Updated on: Nov 21, 2026 | 9:51 AM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेला विराम मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आज ओतूरमध्ये राज्यव्यापी सत्यशोधक समाजाचं अधिवेशन होतंय. या अधिवेशनाला शरद पवार उपस्थित राहणार नसून छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील एकाच मंचावर येणार आहेत. जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे आज राज्यव्यापी सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलंय. या अधिवेशनाचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते नियोजित होतं. मात्र ते बारामतीत असल्याने अधिवेशनाला उपस्थित राहणार नाहीत. दुसरीकडे छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील अमोल कोल्हे या अधिवेशनाच्या निमित्ताने एकाच मंचावर येणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा सध्या थांबलेली असताना या दोन नेत्यांची एकत्रित उपस्थिती राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जातेय. या अधिवेशनात दोन्ही गटांशी संबंधित राजकीय चर्चा होते का, याकडे लक्ष लागलंय. एकाच मंचावर हे सर्व नेते येत आहेत. शरद पवार देखील उपस्थित राहणार होते. मात्र, शरद पवार अनुपस्थितीत असणार आहेत.

Loading...

मागील काही दिवसांपासून शरद पवार यांची तब्येत व्यवस्थित नाही. काही दिवस ते रूग्णालयात देखील होते. रूग्णालयातून त्यांनी घरी सोडण्यात आले पण ते आराम करत असल्याचे सांगितले जाते. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा काही दिवसांपासून रंगताना दिसली. मात्र, त्यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार नसून ज्यादिवशी माझा भाऊ गेला, त्यादिवशी तो विषय आमच्यासाठी संपल्याचे त्यांनी म्हटले.

पुन्हा एकदा राष्ट्रवादी वर्सेस शिवसेना वाद रायगडमध्ये चर्चेत आहे. शिवसेनेचे काही नेत्यांनी श्रीवर्धन मतदारसंघ केलेल्या दाव्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे जशास तसे उत्तर. खासदार सुनील तटकरे यांचा अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना नाव न घेता खोचक टोला लगावला आहे. तटकरे यांनी म्हटले की, सगळ्याच मतदारसंघावर दावा करावा मला काही फरक पडत नाही. या याकरिता काळजी करण्याची गरज नाही. अगदी सातही जागांवर दावा केला तरी मला काही फरक पडत नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us