AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिले जाणार 3214 कोटी रुपये? फडणवीसांनी फोन घुमवला अन्…भुजबळ यांनी दिली मोठी माहिती!

मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत कोणत्या विषयावर चर्चा झाली असे विचारले जात होते. आता खुद्द भुजबळ यांनीच समोर येऊन त्याबाबत माहिती दिली आहे.

मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिले जाणार 3214 कोटी रुपये? फडणवीसांनी फोन घुमवला अन्...भुजबळ यांनी दिली मोठी माहिती!
devendra fadnavis Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 19, 2026 | 3:54 PM
Share

Farmer Help : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी खासदार शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर सुनिल तटकरे हेदेखील फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले होते. आता राष्ट्रवादीचेच नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी 18 मे रोजीच्या रात्री फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीचे नेमके कारण काय होते? असे विचारले जात होते. आता खुद्द भुजबळ यांनीच पत्रकार परिषदेत या भेटीमागचे कारण सांगितले आहे. शेतकऱ्यांना चुकारा देण्याबाबत आमच्या भेटीत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.

भुजबळ-फडणवीस भेटीत काय घडलं?

मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मका आणि धान (तांदूळ) यांचे पैसे अजून शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत या मागणीसाठी आमदार आमच्या पाठीमागे लागले आहेत. अगोदर आपण शेतकऱ्यांना पैसे द्यायचे त्यानंतर भारत सरकार हे पैसे आपल्याला परत करणार, असे एक धोरण आहे. परंतु आता ईकडे फाईल आणि तिकडे फाईल असे चालू आहे. ही सर्व स्थिती मी फडणवीस यांना सांगितली, अशी माहिती भुजबळ यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला अन्…

तसेच, निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर फडणवीस यांनी लगेच संबंधितांना फोन केला. हे सगळे पैसे परत सरकारला मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्यासाठीची जी फाईल आहे ती शोधा आणि शेतकऱ्यांना तत्काळ पैसे अदा करा, असा आदेशही फडणवीस यांनी दिल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.

3214 कोटी रुपयांचे वाटप होणार

धान आणि मका खरेदीचे एकूण 3214 कोटी रुपये शेतकऱ्यांना द्यायचे आहेत. या पैसे देण्याला चुकारा देणे असा शब्द वापरतात, अशी माहितीही भुजबळ यांनी दिली. दरम्यान, फडणवीस यांनी अधिकाऱ्याला फोन करून याबाबतची कार्यवाही करण्याचा आदेश दिल्याने आता आता धान आणि मका विकूनही चुकारा मिळण्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आता लवकरच दिलासा मिळू शकतो असे बोलले जात आहे.

Follow Us
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...