Khavdya Dongar Case: चांदगुडे कुटुंबाच्या निधनानंतर शेजाऱ्यांचा खळबळजनक खुलासा, त्यांच्या घरात कधीच…

Changude Family Neighborhood Reaction: छत्रपती संभाजीनगर एका घटनेने संपूर्ण हादरुन गेले. या घटनेने संपूर्ण देशाचे लक्षवेधले आहे. या घटनेत एकाच वेळी संपूर्ण कुटुंबाने एका क्षणात संपलेले पाहायला मिळाले. आता या संदर्भात शेजाऱ्यांनी एक महत्त्वाची अपडेट दिली आहे.

Khavdya Dongar Case: चांदगुडे कुटुंबाच्या निधनानंतर शेजाऱ्यांचा खळबळजनक खुलासा, त्यांच्या घरात कधीच...
| Updated on: Aug 23, 2026 | 2:12 PM
 Kunal Chandgude Case: छत्रपती संभाजीनगर एका घटनेने संपूर्ण हादरुन गेले. या घटनेने संपूर्ण देशाचे लक्षवेधले आहे. या घटनेत एकाच वेळी संपूर्ण कुटुंबाने एका क्षणात संपलेले पाहायला मिळाले. मुलगा कुणाल चांदगुडे, वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीता चांदगुडे अशा या मृत व्यक्तींची नावे होती. आता त्यांच्या कुटुंबातील आणखी एक सदस्य घरातच अडकून राहिला आहे. तो म्हणजे त्यांचा पाळीव कुत्रा शेरू. तीन दिवसांपासून तो सतत भुंकत आहे. आता या संदर्भात शेजाऱ्यांनी एक महत्त्वाची अपडेट दिली आहे.
आता चांदगुडे यांच्या शेजाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, ” तो ओरडत आहे हे पाहून आम्हालाही त्रास होत आहे. असं वाटतंय की त्याला कोणी मोकळं करावं. दाराला कुलूप आहे आणि एकतर त्याला बांधलेले पण नाहीये, आपण जर कुलूप उघडला तर तो थेट अंगावर येईल, आम्ही इतके शेजारी असून कधीच घरात गेलो नाही कारण खूप भिती वाटते कुत्र्यांची, ते राहिल्या येऊन फक्त तीन ते चार महिनेच झाले आहेत, तो रात्रंदिवस ओरडत आहे. त्याला खिडकीतून पाहिलं की तो ओरडायला सुरुवात करतो, कोणी त्याला पाहिलं की तो ओरडतो आणि पाहिलं नाही की तो शांत बसतो. त्यांच्या नातेवाईकांनी यावं आणि त्याला घेऊन जावं.”
चांदगुडे कुटुंबीय मूळचे जालना जिल्ह्यातील अंबड येथील रहिवासी आहेत. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते नुकतेच इथे राहायला आले आहेत.  मृत कुणाल आणि त्याची आई संगीता हे कुत्र्यासोबत दोघेही घरात सर्वाधिक काळ राहायचे. कुणालचे वडील ट्रकचालक असल्याने ते सर्वाधिक काळ घराच्या बाहेरच असायचे. त्यामुळे शेरू हा त्यांच्या कुटुंबातील चौथा सदस्य आहे. तीन दिवसांपासून तो कुत्रा आता भुंकत आहे. शेजारी लोक जमेल तशी त्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

कुणाल या शेरूची विशेष काळजी घ्यायचा, त्याला दररोज सकाळी फिरायला न्यायचा, सर्वाधिक वेळ त्याच्यासोबत घालवायचा तो प्रयत्न करत असे. यामुळे शेरूलाही त्यांची विशेष सवय झाली होती. आता या शेरूची जबाबदारी संगीता यांच्या वडिलांनी स्वीकारली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us