तीच तीच काय स्क्रिप्ट घासता? आता स्क्रिप्ट रायटर बदला; देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना डिवचले

उद्धव ठाकरे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच भाजपावर जोरदार आरोप केली जात आहेत. आता नुकताच tv9 मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सर्व आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

तीच तीच काय स्क्रिप्ट घासता? आता स्क्रिप्ट रायटर बदला; देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना डिवचले
Chief Minister Devendra Fadnavis
| Updated on: Jan 12, 2026 | 12:41 PM

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच अनेक आरोपांवर थेट उत्तर दिले. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका 15 जानेवारी 2026 रोजी होणार आहेत. 16 जानेवारी 2026 रोजी निकाल लागेल. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात असून मोठं मोठ्या सभांचे आयोजन केले जात आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याच्या नजरा आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई महापालिकेवर आपल्याच पक्षाची सत्ता असावी ही सर्वांची इच्छा आहे. भाजपा आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट एकत्र येऊन मुंबई महापालिका निवडणूक लढवत आहेत. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने मनसेसोबत युती केली. फक्त मुंबईच नाही तर राज्यभरातील पालिका निवडणुका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन लढत आहेत. पहिल्यांदाच मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आला. राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेवर आपलीच सत्ता असणार असा थेट दावा केला.

सतत होणाऱ्या आरोपांवर नुकताच बोलताना देवेंद्र फडणवीस दिसले. राज्यातील सर्व प्रकल्प गुजरातला घेऊन जाण्याचा डाव भाजपाचा असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला. आता त्यावरच बोलताना देवेंद्र फडणवीस दिसले. नुकताच देवेंद्र फडणवीस यांची tv9 मराठीचे मॅनेजिंग एडीटर उमेश कुमावत यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी काही मोठे गाैप्यस्फोट केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपण हे करतो तर तिथे अॅडिशनल रिक्लेमेशन केलं तर तिथे ऑफशोयर रिक्लेमेशन करू शकतो. गुजरातचा पोर्ट पाहिला तर तो चिंचोळा आहे. तिथे एअरपोर्ट आहे. त्या एअरपोर्टचा फायदा काय. वाढवण बंदराचं सर्वात मोठं नुकसान गुजरातला होईल. वाढवणला बंदर नव्हतं. त्यामुळे सर्व माल गुजरातला उतरायचा. ही काय गाडी आहे का चालवत दुसरीकडे नेऊन ठेवली. पार्क करता येते का. मी काय पहिलीतील मुलांबरोबर चर्चा करतो का.

मुंबईची पॉवर ही जेएनपीटीमुळे. पुढचे 100 वर्ष मुंबई आणि महाराष्ट्राची आर्थिक महासत्ता म्हणून वाढवणमुळे ओळख राहणार आहे. यांच्याकडे मॅकेनिझम आहे का. हे पोर्ट गुजरातला कसं जाईल. वाढवण सारखं बंदर का केलं नाही,. बीडीडीतील 80 हजार लोकांना घरं का देऊ शकला नाही. अभ्युदयनगरचा पुनर्विकास का करू शकला नाही. हे लोक विचारतात. तेव्हा उत्तर नसतात. तेव्हा मुंबई तोडणार मुंबई तोडणार म्हणतात. अरे घासली. तीच तीच कॅसेट काय लावता. मी त्यांना सारखं सांगतो. किती दिवस एकच स्क्रीप्टरायटर ठेवणार. ते जुने झाले. आता नवीन स्क्रिप्ट रायटर आणा.