त्या गोष्टीला एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर साक्षीदार; देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंबाबत कोणता केला मोठा गौप्यस्फोट?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती तुटताना नेमके काय घडले आणि मातोश्रीचे दरवाजे आपल्याकरिता कसे बंद झाले, यावर मोठा खुलासा केला आहे. हेच नाही तर यावेळी कोण नेते होते, हे देखील त्यांनी सांगितले.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी भाजपावर गंभीर आरोप केले. मुंबई महापालिकेच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिवसेना ठाकरे समोरासमोर आले असून सातत्याने आरोप केली जात आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची tv9 मराठीचे मॅनेजिंग एडीटर उमेश कुमावत यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस होणाऱ्या आरोपांवर स्पष्ट बोलले असून त्यांनी काही धक्कादायक खुलासेही यादरम्यान केले. उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, देवेंद्र फडणवीसांसाठी किंवा कोणासाठी मातोश्रीचे दार बंद नाही. आता त्यावरच बोलताना देवेंद्र फडणवीस हे दिसले आहेत. यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीचे दार त्यांच्यासाठी कसे बंद झाले हे देखील सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मातोश्रीचं दार त्यांनी बंद केलं होतं. मी नव्हतं केलं. मी फोन करत होतो. एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर साक्षीदार आहेत. ते फोनवर बोलायला तयार नव्हते. आम्ही पाच वर्ष सोबत आहोत. एकत्र निवडणूक लढलो, तरीही तुम्हाला फारकत घ्यायची असेल तर एवढी माणुसकी असली पाहिजे की नाही देवेंद्र माझं नाही जमत.
माझी तुमच्यासोबत जाण्याची मानसिकता नाही. मला दुसरीकडे जायचे आहे. त्यांनी फोनही घेतला नाही. इतक्या वर्षात मी मातोश्रीची कोणती बदनामी केली. मी बोललेलं एक स्टेटमेंट दाखवा. मी विरोधी पक्षनेता असताना आदित्य ठाकरेंवर मला विचारलं गेलं. मी एकमेव विरोओधी पक्षनेता होतो, मी म्हटलं मला असं वाटत नाही. त्यामुळे मी कधीही बिलो द बेल्ट आरोप करत नाही.
त्यांच्यावर आरोप करत नाही. त्यांच्या लोकांनी माझ्याविरोधात माझ्या पत्नीविरोधात खालच्या स्तरावर जाऊन बदनाम केलं. आमच्याबद्दल अश्लील लिहिलं. पुरावे आहेत. मी त्याला रिअॅक्ट केलं नाही. मला मुंबईकरांच्या हृदयाचे दरवाजे उघडले आहेत. आता कोणत्याही दरवाजाची लालसा नाही. मला लालसा नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले. मातोश्रीची बदनामी थांबवा असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते, त्यावरच बोलताना देवेंद्र फडणवीस दिसले.
