AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुती सरकारचे 100 दिवसांचे प्रगती पुस्तक समोर, फडणवीस-शिंदे-अजित दादांचा विभाग कितव्या स्थानावर?

महाराष्ट्रातल्या नवीन महायुती सरकारने आपल्या १०० दिवसांच्या कार्यकाळात ९०२ पैकी ७०६ धोरणात्मक उद्दिष्टे (७८%) पूर्ण केली आहेत. १२ विभागांनी १००% उद्दिष्टे पूर्ण केली, तर १८ विभागांनी ८०% पेक्षा जास्त उद्दिष्टे पूर्ण केली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. सविस्तर माहिती महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महायुती सरकारचे 100 दिवसांचे प्रगती पुस्तक समोर, फडणवीस-शिंदे-अजित दादांचा विभाग कितव्या स्थानावर?
ajit pawar devendra fadnavis eknath shindeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 01, 2025 | 11:49 AM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महायुती सरकारचे प्रगती पुस्तक सर्वसामान्य जनतेसमोर मांडले आहे. राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यकालीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे. यात त्यांनी कोणते विभाग अव्वल स्थानावर, कोणाची किती टक्के कामे पूर्ण झाली आहेत, याबद्दलची माहिती सांगितली आहे. या यादीत एकूण राज्यातील ४८ विभागांच्या प्रगतीचा आढावा देण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी स्वत: ट्वीट केले आहे. राज्यात नवीन महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर शासनाच्या सर्व 48 विभागांनी 100 दिवसांचा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम हाती घेऊन महत्त्वाची नवीन धोरणे, दूरगामी निर्णय व लोकाभिमुख उपक्रमांची आखणी सुरू केली. गेल्या 100 दिवसात या सर्व विभागांनी निश्चित केलेल्या 902 धोरणात्मक उद्दिष्टांपैकी 706 उद्दिष्टे (78%) पूर्णतः साध्य केली आहेत तर उर्वरित 196 उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत संबंधित विभाग आपले काम चालूच ठेवतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

एकूण 48 विभागांपैकी 12 विभागांनी आपली 100% उद्दिष्ट पूर्तता केली आहे तर आणखी 18 विभागांनी 80% पेक्षा जास्त उद्दिष्टे साध्य केली आहेत. सविस्तर माहिती तुम्हाला http://maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल. या परिवर्तनशील व सर्वंकष विकासाच्या वाटचालीच्या मोहिमेत सर्व विभागांनी केलेल्या अतिशय प्रभावी कामगिरीबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी भविष्यात सुद्धा अशीच चांगली कामगिरी करावी, यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.

पाहा सर्व विभागांची यादी

अ.क्र. विभागाचे नाव एकूण मुद्दे कार्यवाही पूर्ण % कार्यवाही प्रगतीपथावर
1 जलसंपदा 37 37 100% 0
2 गृह 31 31 100% 0
3 ग्राम विकास 19 19 100% 0
4 पशुसंवर्धन 18 18 100% 0
5 बंदरे 12 12 100% 0
6 उच्च व तंत्र शिक्षण 11 11 100% 0
7 कामगार 9 9 100% 0
8 वस्त्रोद्योग 8 8 100% 0
9 सांस्कृतिक कार्य 6 6 100% 0
10 खनिकर्म 4 4 100% 0
11 दुग्धव्यवसाय 4 4 100% 0
12 रोजगार हमी योजना 2 2 100% 0
13 ऊर्जा 41 40 98% 1
14 उद्योग 33 32 97% 1
15 महसूल 23 22 96% 1
16 परिवहन 35 33 94% 2
17 शालेय शिक्षण 17 16 94% 1
18 अन्न, औषध प्रशासन 12 11 92% 1
19 मदत व पुनर्वसन 10 9 90% 1
20 विमानचालन 19 17 89% 2
21 कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता 18 16 89% 2
22 महिला व बाल विकास 16 14 88% 2
23 कृषी 29 25 86% 4
24 मत्स्य 7 6 86% 1
25 नगर विकास – 1 34 29 85% 5
26 वैद्यकीय शिक्षण आणि औषध 13 11 85% 2
27 माहिती तंत्रज्ञान 23 19 83% 4
28 सहकार 12 10 83% 2
29 राज्य उत्पादन शुल्क 6 5 83% 1
30 सार्वजनिक आरोग्य 20 16 80% 4
31 मराठी भाषा 4 3 75% 1
32 सार्वजनिक बांधकाम 30 22 73% 8
33 पाणी पुरवठा व स्वच्छता 16 11 69% 5
34 पर्यटन 13 9 69% 4
35 गृहनिर्माण 66 45 68% 21
36 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य 40 27 68% 13
37 मृद व जलसंधारण 21 14 67% 7
38 क्रीडा व युवक कल्याण 12 8 67% 4
39 आदिवासी विकास 35 22 63% 13
40 पर्यावरण 20 12 60% 8
41 माहिती व जनसंपर्क 11 6 55% 5
42 वन 9 4 44% 5
43 इतर मागास बहुजन कल्याण 9 4 44% 5
44 पणन 7 3 43% 4
45 दिव्यांग कल्याण 11 4 36% 7
46 नगर विकास – 2 29 10 34% 19
47 अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण 6 2 33% 4
48 सामान्य प्रशासन (सेवा) 34 8 24% 26
एकूण 902 706 78% 196

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सध्या गृहखातं आहे. त्यांच्या गृहखात्याने चांगली कामगिरी केली आहे. ते दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी ३१ उद्दिष्टे पूर्ण केली आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खाते आहे. यातील नगरविकास खात्यातील ३४ उद्दिष्टांपैकी २९ उद्दिष्टे एकनाथ शिंदेंनी पूर्ण केली आहेत. तसेच गृहनिर्माण खात्यातील ६६ पैकी ४५ उद्दिष्टे पूर्ण झाली आहे. तसेच अजित पवारांकडे अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क हे दोन विभाग आहेत. यात राज्य उत्पादन शुल्कातील ६ पैकी ५ उद्दिष्टे पूर्ण झाली आहेत.

कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....