मुख्यमंत्री पन्हाळ्यावर जाण्यापूर्वी मोठा अनर्थ टळला, नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पन्हाळा गडावरील 13D थिएटरच्या उद्घाटनापूर्वी एका सापाने खळबळ उडवली. कार्यक्रमाच्या ठिकाणी साप आढळल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. परंतु, एका सर्पमित्राने सापाला सुरक्षित पकडून वन विभागाला सुपूर्द केले.

मुख्यमंत्री पन्हाळ्यावर जाण्यापूर्वी मोठा अनर्थ टळला, नेमकं काय घडलं?
| Updated on: Mar 06, 2025 | 10:21 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पन्हाळा गडावर 13D थिएटरच्या उद्घाटन होणार आहे. मात्र त्यापूर्वी एक मोठी घटना घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमस्थळी पोहोण्यापूर्वी तिथे साप आढळला. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. मात्र सुदैवाने एका सर्पमित्राच्या सहाय्याने या सापाला पकडण्यात यश आले. हा साप वन विभागातील अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी पन्हाळा गडावरील ‘13 डी थिएटर’चे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यासोबतच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस हे संध्याकाळी 5 वाजता कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. यानंतर त्यांच्या हस्ते विन्स मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. यानतंर संध्याकाळी साडेसहा वाजता श्रीक्षेत्र पैजारवाडी येथील शिक्षणमहर्षी पांडुरंग हिरवे गुरुजी व शिक्षणव—ती भार्गव देशपांडे गुरुजी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यानंतर संध्याकाळी ८ च्या दरम्यान ते पन्हाळगडावरील ‘13 डी थिएटर’ आणि पन्हाळगडाचा रणसंग्राम लघुपटाचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते केला जाणार होता.

कार्यक्रमस्थळी साप आढळल्याने गोंधळाचे वातावरण

या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक शिवप्रेमींनी गर्दी केली होती. देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला पोहोचण्यापूर्वी पन्हाळगडावर काहीसा गोंधळ पाहायला मिळाला. मुख्यमंत्री कार्यक्रमाला पोहोचण्याआधी कार्यक्रमस्थळी साप आढळल्याने एकच खळबळ उडाली. कार्यक्रमस्थळी साप आढळल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या एक सर्प मित्राने हा साप पकडला. त्यानंतर त्याने पकडलेला साप वन विभागातील अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. यामुळे मोठा अनर्थ टळला.