Abijeet Dipke : अभिजीत दीपके यांना मोठा धक्का, पोलीस संरक्षण काढा, कारवाई करा, कोणी केली मागणी ?

Abhijeet Dipke : CJP चे संस्थापक अभिजीत दीपके हे नुकतेच पोलिसांवर भडकले होते. पोलिसांशी त्यांची शाब्दिक चकमकही झाली होती, तो व्हिडीओ समोर आला होता. मात्र आता दीपके यांना मोठा धक्का बसू शकतो.

Abijeet Dipke : अभिजीत दीपके यांना मोठा धक्का, पोलीस संरक्षण काढा, कारवाई करा, कोणी केली मागणी  ?
अभिजीत दीपके यांना मोठा धक्का
| Updated on: Aug 08, 2026 | 8:52 AM

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक (CJP) संस्थापक अभिजीत दीपके (Abijeet Dipke) सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असून सर्वत्र त्यांचीच चर्चा सुरू असते. दिल्लीतील जंतरमंतर येथील यशस्वी आंदोलनांतर दीपके हे छत्रपटी संभाजीनगर येथील त्यांच्या घरी आले असून सध्या त्यांचा तिथेच मुक्काम आहे. सीजेपीची आगामी रणनीती ठरवण्यात येत असून, त्यांच्या बैठकाही सुरू आहेत. तसचे अभिजीत दीपके यांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी नेत्यांपासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत अनेक जण त्यांच्या घरी येताना दिसतात. मात्र नुकतीच अभिजीत दीपके हे पोलिसांवर भडकल्याचे आणि त्यांची शाब्दिक चकमक झाल्याचे दिसून आले. त्यासंदर्भातील एक व्हिडीओही समोर आला होता. भेटण्यासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना पोलीस उद्धट वागणूक देत असल्याचा थेट आरोप करताना दीपके संतापले होते. त्यानंतर शाब्दिक चकमक झाली आणि मोठा ड्रामाही झाला.

दीपके यांच्या अडचणी वाढणार  ?

याचदरम्यान आता एक मोठी घडामोड पहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अभिजीत दीपके यांना मोठा धक्का बसू शकतो. कारण दीपके यांना देण्यात आलेलं पोलीस संरक्षण तात्काळ काढून घेण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे ही मागणी केली आहे. पोलीस अधिकाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा दीपके यांच्यावर आरोप आहे. तसेचत अभिजीत दीपके यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर दीपके यांचं पोलीस संरक्षण काढलं नाही तर आंदोलन करू, असा इशाराही महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनने दिला आहे. त्यामुळे मोठी खळबळ माजली असून हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण ?

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथील अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र नागरिकांना माझी भेट घेण्यापासून रोखल्याचा,पोलीस उद्धटपणे वागत असल्याचा आरोप अभिजीत दिपके यांनी केला होता. यावेळी त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याला थेट जाब विचारत, “मी कोणाल भेटायचं हे पोलिसांनी मला सांगायचं नाही? मी कोणाला भेटायचे आणि कोणाला नाही, हे मी ठरवणार,” अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली.

तसेच, “तुम्ही कोणत्या विभागाचे आहात? कोणत्या पोलीस ठाण्याचे आहात? तुमचे पद काय आहे?” अशी विचारणा करत त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला धारेवर धरलं होतं. नागरिक आपल्याला भेटण्यासाठी येत असताना पोलीस त्यात हस्तक्षेप करत असल्याचा संताप व्यक्त करत दिपके यांनी, “तुम्ही बाहेर जा,” असे म्हणत संबंधित अधिकाऱ्याला आपल्या निवासस्थानाच्या परिसरातून बाहेर जाण्यास सांगितल्याचाही दावा करण्यात आला होता.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us