AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP Mumbai protest : ज्ञानेश कुमार हेच मोदींच्या दुकानाचे मास्टमाईंड, आशुतोष रांकांचा हल्लाबोल

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी सीजेपी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. आपल्या या मागण्यासाठी आता सीजेपीनं मुंबईत आंदोलनाला सुरुवात केली आहे. यावेळी बोलताना सीजेपीचे आंंदोलक आशुतोष रांका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

CJP Mumbai protest : ज्ञानेश कुमार हेच मोदींच्या दुकानाचे मास्टमाईंड, आशुतोष रांकांचा हल्लाबोल
Ashitosh RankaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 02, 2026 | 6:32 PM
Share

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी सीजेपी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. आपल्या या मागणीसाठी आता सीजेपीनं मुंबईत आंदोलनाला सुरुवात केली आहे. यावेळी बोलताना सीजेपीचे आंंदोलक आशुतोष रांका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘आज शिवाजी पार्कच्या बाहेर जेवढी गर्दी आहे, जेवढे लोक उपस्थित आहेत, ते पाहून मोदीजींना कल्चरल शॉक नक्कीच लागला असेल. मोदीजींचं जे दुकान चालू आहे, मी चहाच्या दुकानाची गोष्ट करत नाहीये, तर जे मोदींचं दुकान चालू आहे, ते चालवण्यामागचे मास्टर माईंड हे ज्ञानेश कुमार आहेत,’ असा हल्लाबोल यावेशी कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलक आशितोष रांका यांनी केला आहे.

गेल्या दोन वर्षांमध्ये या देशात जवळपास तेरा कोटी लोकांची नावं मतदार यादीमधून वगळण्यात आले आहेत. देशात एकूण जेवढे मतदार आहेत, त्यातील सुमारे 15 टक्के मतदान या लोकांनी कमी केले आहेत. जेव्हा आपण संविधानाचा स्वीकार केला, तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला. जेव्हा आपण काहीच नव्हतो, तेव्हा या देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळाला होता. अमेरिका हा जगातील सर्वात जुना लोकशाही देश आहे. मात्र त्या देशाला देखील आपल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार देण्यासाठी दोनशे वर्ष लागले होते, असंही यावेळी रांका यांनी म्हटलं आहे.

आपल्या विविध मागण्यांसाठी सीजेपीच्या वतीने मुंबईमध्ये हे आंदोलन करण्यात आलं आहे. यामध्ये प्रमुख मागणी म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, एसआय आर प्रक्रिया रद्द करण्यात यावी, तसेच 2025  चीच मतदार यादी 2029 मध्येही कायम ठेवावी अशी मागणी सेजीपीच्या वतीने करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये सीजेपीचं आंदोलन झालं. या आंदोलनाला विविध राज्यातून आलेले जेन झी सहभागी झाले होते. या आंदोलनाला सरकारने परवानगी नाकारली होती.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा