AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात नवा वाद, सावित्रीबाईंच्या नावाआधी साध्वी लिहिल्यानं संताप, समता सैनिक दलानं नावही झाकलं

पुण्यात नवा वाद, सावित्रीबाईंच्या नावाआधी साध्वी लिहिल्यानं संताप, समता सैनिक दलानं नावही झाकलं

पुण्यात नवा वाद, सावित्रीबाईंच्या नावाआधी साध्वी लिहिल्यानं संताप, समता सैनिक दलानं नावही झाकलं
PUNE SAVITRIBAI PHULE GARDEN
| Edited By: | Updated on: Sep 30, 2021 | 10:03 PM
Share

पुणे : पुण्यातील ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाजवळ महानगरपालिकेने एका उद्यानाला नाव देताना पाटीवर साध्वी सावित्रीबाई फुले असा उल्लेख केलाय. साध्वी या नावामुळे पुण्यात चांगलाच गजहब उडाला आहे. या नावाला समता सैनिक दल, तसेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र आक्षेप घेतलाय. समता सैनिक दलाने तर निळ्या शाईने साध्वी हे नाव झाकून टाकलं आहे. उद्यानाच्या नावावरुन पुण्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

नेमका प्रकार काय आहे ?

पुणे शहरात सध्या एका वादग्रस्त पाटीमुळे तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पुण्यातील ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाजवळ पुणे महानगरपालिकेने एका उद्यानाला नाव देताना पाटीवर साध्वी सावित्रीबाई फुले असा उल्लेख केलाय. या पाटीवरील सावित्रीबाईंच्या नावाअगोदर असलेल्या साध्वी या शब्दाला अनेकांनी आक्षेप घेतलाय. आदर्श व्यक्तींचे दैवतीकरण आणि हिंदुत्ववादी विशेषणे लावून धार्मिकीकरण करणे चुकीचे आहे अशा प्रतिक्रिया उमटत आहे. पाटीवरील साध्वी हा शब्द खोडावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. तसेच साध्वी शब्दावर आक्षेप घेत समता सैनिक दलाने सध्या हा शब्द झाकून टाकला आहे.

नाव बदला अन्यथा तीव्र आंदोलन

तसेच सावित्रीबाईंच्या नावाअगोदर क्रांतिज्योती विशेषण लावावे अशी मागणी समता सैनिक दलाने केली आहे. तसेच महापालिकेने उद्यानाच्या नावात त्वरित बदल केला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारादेखील देण्यात आला आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनीसुद्धा या नावावर आक्षेप घेतला होता. त्यांनी थेट शहराध्यक्षांना फोन करुन नाव बदलण्याचे सांगितले.

ठराव झाल्यानंतरच नाव दिलं जातं

या नावाबाबत कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिलेली आहे. साध्वी सावित्रीबाई फुले असं नामफलक असलेली पाटी आता  काही लोकांच्या नजरेत आली आहे. महापालिकेत नाव ठरावण्याबाबत एक कमिटी असते. त्याच्यात ठराव झाल्यानंतरच त्या उद्यानाला रस्त्याला नाव दिलं जातं. विजयसिंह मोहिते मंत्री असताना 1991 साली ही कोनशिला लावण्यात आली आहे. हे जरी त्यावेळेस करण्यात आलं असलं तरी या उद्यानाला साध्वी सावित्रीबाई फुले हे नाव का देण्यात आलं हे शोधण्याची गरज आहे. काँग्रेसच्या काळात साध्वी हे नाव या उद्यानाला देण्यात आलं आहे. पालिकेच्या कमिटीत हे नाव का दिलं होत का ? हे शोधण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया सरोदे यांनी दिली.

पालिकेने नाव बदलून दुसरी पाटी लावावी 

तसेच हे नाव त्याकाळी देण्यात आलं असलं तरी हे नाव आक्षेपार्ह आहे. कारण सावित्रीबाई फुले या रचनात्मक काम करणाऱ्या व्यक्ती आहे. सावित्रीबाई यांना साध्वी म्हणणे म्हणजे त्यांना एका धर्मात बांधल्या सारखं आहे. त्यामुळे त्यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असं आपण म्हणू शकतो. कारण त्यांनी क्रांती घडून आणली होती. त्यामुळे आता महापालिकेने ते नाव बदलून दुसरी पाटी लावावी, अशी मागणी सरोदे यांनी केली आहे.

इतर बातम्या :

लातूरच्या स्वप्नालीचा वर्ल्ड रेकॉर्ड, सलग 4 तासांत गायली 92 गाणी, लता मंगेशकर यांना अनोखा नजराणा

पुणे महापालिकेकडे 1.50 रुपयांची सिरींज नसणं दुर्दैव, सत्ताधाऱ्यांचा भोंगळ कारभार सुरु, प्रशांत जगताप यांचा आरोप

कर संकलन मजबूत, ऑगस्टमध्ये वित्तीय तूट मोठ्या प्रमाणात घसरली, तरीही 4.68 लाख कोटींच्या कर्जाचा बोजा

(clash on pune garden name prakash ambedkar and samta sainik dal opposes name sadhvi savitribai fule)

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.