क्लिन रोड ड्राईव्हसाठी अनिल पवार यांचा सन्मान, उत्कृष्ट अभियंता पुरस्कार

| Updated on: Sep 17, 2022 | 4:47 PM

पवार यांना सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आला.

क्लिन रोड ड्राईव्हसाठी अनिल पवार यांचा सन्मान, उत्कृष्ट अभियंता पुरस्कार
Image Credit source: tv9
Follow us on

धुळे : येथे क्लिन रोड ड्राईव्ह (Clean Road Drive) हा कार्यक्रम राबवल्याने अभियंता अनिल पवार (Engineer Anil Pawar) यांचा सन्मान करण्यात आला आहे. रस्त्याची कामं वेळेत आणि सुनियोजित पद्धतीने केल्याने त्यांची पाठ थोपटण्यात आली आहे. याशिवाय अभियंता रवींद्र केडगे यांनी पथकर वसुली बंद करण्याचा कार्यक्रम राबवला, हा कार्यक्रमही अनिल पवार यांनी पुढाकाराने यशस्वी केला, ज्यासाठी त्यांचा सन्मान करण्यात आला. पवार यांना सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचा सार्वजनिक बांधकाम (Public works department) मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सोनीक, राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, राज्याचे सचिव सदाभाऊ साळुंखे यांच्यासह अनेक मान्यवर आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्लीन रोड ड्राईव्ह ही संकल्पना

अनिल पवार हे सध्या वांद्रे मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम मंडळाचे किनारी अधीक्षक अभियंता म्हणून काम पाहतात. तर सन 2015 मध्ये ते सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नाशिक अंतर्गत असलेल्या धुळे सार्वजनिक बांधकाम मंडळात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत होते. यावेळी त्यांनी क्लीन रोड ड्राईव्ह ही संकल्पना यशस्वीपणे राबवली. तर याकामी तत्कालीन मुख्य अभियंता इंजि. रवींद्र केडगे यांनी देखिल महत्वाची भूमिका पार पाडली होती. त्यांनी रस्त्यांची नियतकालिक दुरुस्तीची कामे ही सुनियोजित पद्धतीने करत गुणवत्ता राखली होती. त्यामुळेच पवार यांची आज पाठ थोपटण्यात आली आहे.

पथकर वसुली बंद करण्यासाठी पुढाकार

तसेच मुख्य अभियंता म्हणून कार्यरत असताना केडगे यांनी, पथकर वसुली बंद करण्यासाठी औरंगाबाद उच्च न्यायालयात पाठपुरावा केला होता. त्यानंतर पथकर वसुली बंद करण्यासाठी पवार यांनी पुढाकार घेतला होता. तसेच त्यांनी राज्यातील पहिले ई-टेंडर आणि ई-एमबी सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार येथे कार्यान्वित केले होते. या कार्यचा उल्लेखही यावेळी करण्यात आला. सध्या अभियंता पवार हे मुंबई बांद्रा येथे सार्वजनिक बांधकाम मंडळाचे किनारी अधीक्षक अभियंता म्हणून सेवा बजावत आहेत.