AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Climate change : वातावरण बदलाचा शेतकऱ्यांना फटका, पिकांची नासाडी तर फळांना कीड

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव-खडकी येथे गारांच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

Climate change : वातावरण बदलाचा शेतकऱ्यांना फटका, पिकांची नासाडी तर फळांना कीड
Climate changeImage Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 16, 2023 | 12:45 PM
Share

महाराष्ट्र : नांदेडमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) ढगाळ वातावरण यासारख्या सातत्याने बदलणाऱ्या हवामानाचा (Climate change) भुईमुंगाच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. भुईमुंग पिकाला अपेक्षित अशी फळधारणा झाली नसल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर उन्हाळी भुईमुगाच्या पिकाकडून (Groundnut crop) शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा होती. मात्र अस्मानी संकटामुळे भुईमूग पिकावर केलेला खर्च ही वसूल होण्याची चिन्हे दिसने झालीत असं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे नांदेड मधला भुईमूग उत्पादक शेतकरी हवालदिल बनला आहे.

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनाठा गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. मनाठा गावातील कामाई नगर आणि नई अबादी भागात नळाला पाणीचं येत नाही. 2016 साली मुख्यमंत्री पेयजल योजनेतुन दोन जलकुंभ बांधण्यात आले. पण पाईप लाईनमध्ये लिकेज असल्याने या भागांना पाणी येत नाही. या भागांतील नागरिकांना एक किलो मीटर अंतरावरील शेतातील विहीरीतून पाणी आणावं लागतं आहे. ग्रामपंचायतीने अनेक ठिकाणी बोअर मारले पण पाणी लागलं नाही. दरम्यान प्रशासनाने टंचाई निवारनासाठी उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी आहे.

सलग दुसऱ्या आठवड्यात पुन्हा गारपीट झाल्याने बीड जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. आष्टी तालुक्यातील अरणविहरा, हारेवाडी, मराठवाडी, पिंपळगाव घाटसह तब्बल 12 गावात गारपीठ झाली. गारपीठ एवढी मोठी होती की अक्षरशः हिमालयाचे स्वरूप शेतात पहावयास मिळाले. तर सर्वात जास्त फटका अरणविहरा गावाला बसला असून अनेक घरांचे पत्रे उडून गेले असून भिंती कोसळल्या आहेत. तर या घरात अजूनही गारांचा खच बघायला मिळतोय.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव-खडकी येथे गारांच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह तूफान गारांचा मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी झाल्याने शेतकऱ्याची मोठी आर्थिक हानी झाली आहे. ह्या परिसरात कांदा काढणीची लगबग सुरू असल्याने गारांमुळे कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. साठवणुकीसाठी वखारीत ठेवलेला कांदा पावसाच्या पाण्यामुळे भिजल्याने आणि शेतातील बागायती तसेच चारापिके उध्वस्त झाल्यामुळे शेतकरी कोलमडून पडला आहे.

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.