Devendra Fadnavis : ‘पवार साहेबांनी जे काही सांगितलं ते..’ शरद पवारांनी केलेल्या मोदींच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की..
CM Devendra Fadnavis : राजकारणात टीका-टिप्पणी सुरु असते. विरोधी पक्ष अपवादानेच सत्ताधाऱ्यांचं कौतुक करतो. काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. त्यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“महाटेक CSR कॉनक्लेव्ह आयोजित करण्यात आला. मोठ्या प्रमाणात टेक कंपन्या आणि इतर सीएसआर पार्टनरसोबत जवळपास 150 कोटीचे करार या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये या कंपन्या वेगवेगळ्या ठिकाणी सीएसआर Activity करणार आहेत. मूळात आपल्याकडे सर्वात जास्त CSR महाराष्ट्रात येतो. पण गेले अनेकवर्ष तो MMR आणि PMR रीजन यात जास्त खर्च होतो” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. “हा प्रयत्न असा आहे की महाराष्ट्राच्या सर्व भागात गडचिरोलीपासून नंदूरबारपर्यंत CSR Activity चालावी. प्रयत्न असा आहे की शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकासाचं क्षेत्र असेल अशा विविध क्षेत्रांमध्ये CSR पार्टनस सोबत पार्टनरशिप करुन एका स्केलवर या सगळ्या गोष्टी नेण्याचा प्रयत्न करत आहोत. मला वाटतं एक नवीन सुरुवात आयटी विभागाने ही केलीय. दरवर्षी असा कॉनक्लेव्ह होईल” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
शरद पवारांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. त्या संदर्भात पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारलं. ते म्हणाले की, “पवार साहेबांनी जे काही सांगितलं ते महत्वाचं आहे. ज्यावेळी अनेक लोक पंतप्रधान परदेशात का गेले? अशी टीका करत होते त्यावेळी ज्या प्रकारचे रणनितीक करार या दौऱ्यात केले. त्यामुळे पुढच्या 10-20 वर्षाचं भवितव्य सुरक्षित झालं आहे. म्हणून पवार साहेबांनी सांगितलं की, विनाकारण टीका करु नका. पंतप्रधान देशाच्या हिताचं काम करत आहेत”
विधानपरिषद महायुती म्हणून लढवण्यावर काय म्हणाले?
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. विधान परिषदेच्या 16 जागा लढवण्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, “स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत आमचा प्रयत्न असा आहे की, तिन्ही पक्षांनी एकत्रित बसून याचा निर्णय करावा” “निश्चितपणे वेगवेगळ्या निकषांवर आम्ही चर्चा करत आहोत. या निवडणुकांमध्ये आम्ही तिघे एकत्रित गेलो पाहिजे असा प्रयत्न आहे”
देशात अणूऊर्जेची सुरुवात महाराष्ट्रात झाली
“आता संपूर्ण जग हे ऊर्जा क्षेत्रात अणू ऊर्जेकडे जातय. जर आपल्याला स्वच्छ ऊर्जा हवी असेल, तर जो पर्यंत बेस लोडला न्यूक्लियर ऊर्जा आणत नाही, तो पर्यंत काबर्न फ्री एनर्जी आपल्याला मिळू शकत नाही. “देशात अणूऊर्जेची सुरुवात महाराष्ट्रात झाली होती. पुन्हा या संपूर्ण न्यूक्लियर एनर्जीला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करत आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.