AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8 महिलांचे 35 Video, खरातच्या जवळच्या व्यक्तीनेच गेम केला, फडणवीसांनी थेट नाव घेत…

लिंगपिसाट अशोक खरातच्या जवळच्या व्यक्तीनेच त्याचा गेम केला आहे. त्याने व्हिडीओ रेकॉर्ड केले होते. या व्यक्तीनेच खरातच मोठा गेम केल्याचे समोर आले.

8 महिलांचे 35 Video,  खरातच्या जवळच्या व्यक्तीनेच गेम केला, फडणवीसांनी थेट नाव घेत...
अशोक खरातImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 24, 2026 | 7:05 PM
Share

नाशिकच्या स्वयंघोषित ज्योतिषी आणि ‘कॅप्टन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात यांच्या लैंगिक शोषण, बलात्कार आणि इतर गंभीर आरोपांच्या प्रकरणात विशेष तपास पथक (SIT) ने तपासाला वेग दिला आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाबाबत सर्व माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ‘एकूण ८ महिलांचे ३५ व्हिडीओ समोर आले. सदर व्हिडीओत अशोक खरातने भोंदूगिरी आणि तंत्रमंत्र करून अनेक महिलांशी बलात्कार आणि अश्लील चाळे केल्याचे दिसले.’ तसेच हे व्हिडीओ खरातच्या जवळच्या व्यक्तीने देऊन गेम केल्याचे सांगितले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, व्हॉट्सअप अॅप्लिकेशनवर फिर्यादी आणि एका महिलेचे फोटो प्रसारीत करून हे फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी दिली. पाच कोटीची खंडणी मागितली. दिनेश परब याला राजेंद्र जासूदने फोटो दिल्याची तक्रार दिली होती. वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा प्राथमिक तपास नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेने केला. अशोक खरातचा मोबाईल सायबरला दिला. त्यात काही सापडलं नाही. चॅटमध्ये काही मिळालं नाही. राजेंद्र जासूद आणि दिनेश परबला अटकपूर्व जामीन मिळाला आहे. नीरज जाधवच्या सहभागाबाबत तपासात आरोप आढळला नाही. त्याच्या सहभागाचा तपास सुरू आहे.

पुढे ते म्हणाले, १८ फेब्रुवारी रोजी शिर्डीत एका महिलेने तक्रार दिली. नीरज जाधवने तिचा एआय जनरेटेड अश्लील फोटो पाठवला आणि लगेच डीलिट केला. त्यानुसार नीरज जाधव विरोधात गुन्हा दाखल केला. त्या महिलेने तिचा मोबाईल तपासायला दिला नाही. कोणत्या नंबरवरून फोटो आला हे ही सांगता आलं नाही.

लूकआऊट नोटीस काढली

शेवटी व्हिडीओबाबत बोलताना ते म्हणाले, एकूण ८ महिलांचे ३५ व्हिडीओ समोर आले. सदर व्हिडीओत अशोक खरातने भोंदूगिरी आणि तंत्रमंत्र करून अनेक महिलांशी बलात्कार आणि अश्लील चाळे केल्याचे दिसले. ज्या साक्षीदाराने व्हिडीओ दाखवले त्याला अशोक खरातकडून जीवाला धोका होता. तो व्हिडीओ द्यायला तयार नव्हता. तसेच कागदपत्री हमी द्यायलाही तयार नव्हती. पोलिसांनी कुशलतेने त्याच्याकडून व्हिडीओ घेतले. अशोक खरात परदेशात पळून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी लूकआऊट नोटीस काढली.

Follow Us
पंतप्रधांसोबच्या भेटीतील खास किस्सा! अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया
पंतप्रधांसोबच्या भेटीतील खास किस्सा! शरद पवारांबाबत काय म्हणाले? अमोल कोल्हेंनी सगळंच सांगितलं
चाकरमान्यांसाठी सोमवार ठरला त्रासदायक! पश्चिमसह मध्य रेल्वेवर....
Mumbai Local News | चाकरमान्यांसाठी सोमवार ठरला त्रासदायक! पश्चिमसह मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड; लोकल उशिराने
शेतकरी कर्जमाफीवर मोठी अपडेट! 1 लाख 40 हजार शेतकरी पात्र; वेळ लागेल...
शेतकरी कर्जमाफीवर मोठी अपडेट! 1 लाख 40 हजार शेतकरी पात्र; वेळ लागेल, पण... नेमकं काय म्हणाले बाबासाहेब पाटील?
मोठी खळबळ! ठाकरे गटाचा मोठा डाव; सहा फुटीर खासदारांच्या अडचणी पुन्हा..
मोठी खळबळ! ठाकरे गटाचा मोठा डाव; सहा फुटीर खासदारांच्या अडचणी पुन्हा वाढल्या?
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळेंची खासदारांसह पंतप्रधानांच्या भेट
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळे खासदारांसह पंतप्रधानांच्या भेटीसाठी दाखल; व्हिडीओ आला समोर
बावनकुळेंच्या सूचनेनं एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही...
Chandrashekhar Bawankule | कुणबी प्रमाणपत्रावरून मोठा ट्विस्ट! बावनकुळेंच्या सूचनेनं एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही; अधिकाऱ्याचं पत्र आलं समोर
अजूनही वेळ गेलेली नाही! जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
Manoj Jarange VS Chandrashekhar Bawankule | अजूनही वेळ गेलेली नाही! जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम; बावनकुळेंवरही जोरदार हल्लाबोल
शरद पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटण्याआधीच बड्या नेत्याचं थेट विधान
शरद पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटण्याआधीच बड्या नेत्याचं सूचक विधान, म्हणाले...
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर! मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर! मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी न्यायमूर्तींची अचानक बदली, नेमकं काय घडलं?
आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते अमित शाहांना दाखवू
Sanjay Raut | संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा! आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते अमित शाहांना दाखवू