AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cm Eknath Shinde : नव्या सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, प्रतिहेक्टर 13 हजार 600 रुपयांची मदत जाहीर

एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे 6 हजार 800 मिळत होती. त्यापेक्षा दुप्पट मदत आम्ही देणार आहोत. म्हणजे प्रतिहेक्टर 13600 रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलीय.

Cm Eknath Shinde : नव्या सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, प्रतिहेक्टर 13 हजार 600 रुपयांची मदत जाहीर
नव्या सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, प्रतिहेक्टर 13 हजार 600 रुपयांची मदत जाहीरImage Credit source: tv9
| Updated on: Aug 10, 2022 | 5:48 PM
Share

मुंबई : नव्या मंत्रिमंडळाची आज एक महत्वाची बैठक (Cabinet Meeting)पार पडली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यात 15 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या (Farmer Help) मागणीनुसार, त्यांना दिलासा देण्यासाठी शिवसेना भाजप सरकारने विशेष बाब म्हणून आतापर्यंत कधीही नुकसान भरपाई मिळाली नाही तेवढी, म्हणजे एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जी मदत दिली जात होती त्याच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय झालाय. तसच दोन हेक्टरची मर्यादा वाढवून आम्ही ती 3 हेक्टर केली आहे. हा एक मोठा निर्णय आम्ही घेतलाय. एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे 6 हजार 800 मिळत होती. त्यापेक्षा दुप्पट मदत आम्ही देणार आहोत. म्हणजे प्रतिहेक्टर 13600 रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलीय. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

गेल्या अनेक दिवसात राज्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलेलं आहे. अनेक भागातील शेतकऱ्यांची पीक ही अतिवृष्टीमुळे पाण्यात गेलेली आहेत. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला होता. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून तसेच विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडून वारंवार होत होती. गेल्या काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती, तसेच अजित पवार यांनीही नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला होता. त्यानंतर काल नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि आज शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना तुर्तास तरी दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या पुन्हा पिकं उभी करण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे.

कॅबिनेटमधील दुसरा महत्वाचा निर्णय

आजच्या कॅबिनेटमध्ये आणखी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. तो म्हणजे मेट्रो 3 बाबत वाढलेली किंमत मंजूर करण्यात आलीय. गेल्या काही काळात हा प्रकल्प रखडल्याने 10 हजार कोटींनी किंमत वाढली आहे. आता 33 हजार कोटी किंमतीचा हा प्रकल्प झाला आहे. जो 23 हजार कोटीची किंमतीचा होता, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलीय.  तसेच या प्रकल्पाची 85 टक्के कामे पूर्म झाली आहेत. तर कार डेपोचं काम 29 टक्के पूर्ण झालेले आहे, ते मार्गी लावायचे आहे, 2023 साली पहिला फेज सुरु करायचा आहे, असेही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितलेलं आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.