Cm Eknath Shinde : काही तासातच नव्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता, जिल्ह्यांचे पालकमंत्रीही ठरले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस या खाते वाटपाची घोषणा करू शकतात, असेही सांगण्यात आलेले आहे, त्यामुळे लवकर प्रत्येक खात्याला नवे मंत्री तसेच प्रत्येक जिल्ह्याला नवे पालकमंत्री मिळणार आहेत.

Cm Eknath Shinde : काही तासातच नव्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता, जिल्ह्यांचे पालकमंत्रीही ठरले?
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस,
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 5:23 PM

मुंबई : राज्यातल्या बहुचर्चित नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी (Maharashtra Cabinet Expansion) कालच पार पडलाय. मात्र कोणत्या मंत्र्याला कोणतं खाता मिळणार याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. हा सस्पेन्स आता लवकरच संपण्याची चिन्ह तयार झालेले आहेत. कारण आज नव्या मंत्रिमंडळाची एक रॅपिड फायर बैठक पार पडली (Cabinet Meeting) आहे. या बैठकीत खाते वाटपाबाबत चर्चा झालेली आहे. तसेच जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाबाबतही चर्चा झाल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातल्या नव्या मंत्र्यांचं खातेवाटप काही तासातच जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस या खाते वाटपाची घोषणा करू शकतात, असेही सांगण्यात आलेले आहे, त्यामुळे लवकर प्रत्येक खात्याला नवे मंत्री तसेच प्रत्येक जिल्ह्याला नवे पालकमंत्री मिळणार आहेत. या संभाव्य खातेवाटपाची यादीही विश्वसनीय सुत्रांकडून देण्यात आलीय.

संभाव्य खातेवाटपाची यादी

  1. मुंबई – मंगलप्रभात लोढा – विधी आणि न्याय
  2. ठाणे – एकनाथ शिंदे – नगरविकास खाते
  3. नागपूर – देवेंद्र फडणवीस – अर्थ आणि गृह
  4. ठाणे – रवींद्र चव्हाण – गृहनिर्माण
  5. रत्नागिरी – उदय सामंत – उद्योग
  6. सिंधुदुर्ग – दीपक केसरकर – पर्यटन आणि पर्यावरण
  7. पुणे – चंद्रकांत पाटील – सार्वजनिक बांधकाम
  8. सांगली – सुरेश खाडे – सामाजिक न्याय
  9. नगर – राधाकृष्ण विखे पाटील – महसूल आणि सहकार
  10. सातारा – शंभूराजे देसाई – उत्पादन शुल्क
  11. नाशिक – दादा भुसे – कृषी
  12. जळगाव – गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
  13. जळगाव – गिरीश महाजन – जलसंपदा
  14. नंदूरबार – विजयकुमार गावित – आदिवासी विकास
  15. औरंगाबाद – संदीपान भुमरे – रोहयो योजना
  16. औरंगाबाद – अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक
  17. औरंगाबाद – अतुल सावे – आरोग्य
  18. उस्मानाबाद- तानाजी सावंत – उच्च आणि तंत्र शिक्षण
  19. चंद्रूपर – सुधीर मुनगंटीवार – उर्जा आणि वन
  20. यवतमाळ- संजय राठोड – ग्रामविकास

मंत्रिमंडळ विस्तारानंतरही विरोधक आक्रमक मोडवर

गेल्या 40 दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तारावरून एकनाथ शिंदे सरकारला घेण्याचे काम विरोधकांकडून होत होतं. राज्यात नव मंत्रिमंडळ नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांना वेळीच मदत पोहोचत नाही, तसेच जनतेची अनेक कामं रखडलेले आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून करण्यात येत होता. त्यामुळे आता नवं मंत्रिमंडळ एक्शन मोडमध्ये आल्यानंतर तर शेतकऱ्यांसाठी काही मोठ्या घोषणा होणार का याकडे राज्यातील बळीराजा डोळे लावून बसलाय, गेल्या अनेक दिवसात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यांना तात्काळ मदतीची अपेक्षा या नव्या सरकारकडून लागलीय.

Non Stop LIVE Update
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.