AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maratha Reservation Protest | ‘दोषींवर कारवाई होणार’, लाठीचार्जच्या घटनेवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

Maratha Reservation Protest news in Maharashtra | जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलीय.

Maratha Reservation Protest | 'दोषींवर कारवाई होणार', लाठीचार्जच्या घटनेवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
| Updated on: Sep 01, 2023 | 8:26 PM
Share

जालना | 1 सप्टेंबर 2023 : जालन्यात आंतरवली सराटे गावात आज मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. या लाठीचार्जचे व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओंमध्ये पोलिसांनी किती भीषण लाठीचार्ज केलाय ते स्पष्ट दिसत आहे. गावकऱ्यांनी दगडफेक केला. त्यामुळे लाठीमार आणि अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पण या घटनेमुळे मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाले. मराठा आंदोलकांनी धुळे-सोलापूर मार्गावर काही वाहनांची जाळपोळ केली. तसेच दगडफेक करण्यात आली. या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिलीय.

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

“मी स्वत: उपोषणकर्त्याबरोबर बोललो होतो. मी अधिकाऱ्यांनाही बोललो होतो. पोलीस एस पी आणि कलेक्टरशी माझं बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होतं. त्यांनी सांगितलं की, जरांगे पाटील यांना रुग्णालयात नेणं जरुरीचं होतं. त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न सुरु होता. पण त्यावेळी दगडफेकीची दुर्देवी घटना घडली”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.

“मराठा समाजाच्या आरक्षणावर सरकारची स्पष्ट भूमिका आहे. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावं यासाठी न्यायालयीन लढाई सुरु आहे. उपसमितीची वारंवार बैठक घेत आहेत. यामधून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि कोर्टातही टिकायला पाहिजे यासाठी सरकार प्राध्यान्याने काम करत आहे. पण असं असताना दुर्देवी प्रकार समोर आला आहे. सरकार याची सखोल चौकशी करेल. यातून खरं वास्तव्य समोर येईल. दोषी ठरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल”, असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं.

“शांततेत आंदोलकांवर लाठीचार्ज करता कामा नये, अशी सरकारची भूमिका आहे. यावर सरकार योग्य ती उच्च स्तरीय चौकशी करेल. मराठा समजाला मी शांततेचं आवाहन करतो. शांतता प्रस्थापित करणं हे पहिलं काम केलं पाहिजे. लाठीचार्जवर चौकशी केली जाईल आणि दोषी आढळले तर कारवाई केली जाईल. मराठा आरक्षण हा उद्देश सर्वांचा आहे. अशाप्रकारच्या घडू नयेत यासाठी मराठा समन्वयकांनी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे. सरकार पूर्णपणे त्यांच्या बाजूने आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

‘शरद पवार मोठे नेते, पण…’

दरम्यान, संबंधित घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या मनात एखाद्या घटकाविषयी असलेली भावना पोलिसांच्या कृतीतून दिसली असावी, गृहमंत्र्यांनी पोलिसांना तशी सूचना केली असावी, अशी टीका शरद पवारांनी दिली. त्यांनी या घटनेवर निषेध व्यक्त केला. याबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी “राज्य सरकारची जबाबदारी आहे. पण शरद पवार हे मोठे नेते आहेत. अशा घटनेवेळी शांतता प्रस्थापित करणारं आवाहन केलं पाहिजे. आणखी उद्रेक होईल, अशाप्रकारची भूमिका कुठल्याही नेत्याने घेऊ नये”, असं आवाहन केलं.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.