Jitendra Awhad | एका प्रसंगामुळे आव्हाडांना आठवली मुख्यमंत्र्यासोबतची जुनी मैत्री, काळजी वाटली आणि लगेच….

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी खास टि्वट केलय. त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल वाटणारी चिंता, काळजी व्यक्त केली आहे. 'हे असं करणं महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि आपल्या वैयक्तिक दृष्टीने चुकीचे आहे'

Jitendra Awhad | एका प्रसंगामुळे आव्हाडांना आठवली मुख्यमंत्र्यासोबतची जुनी मैत्री, काळजी वाटली आणि लगेच....
Jitendra Awhad-eknath shinde
| Edited By: | Updated on: Aug 11, 2023 | 1:18 PM

ठाणे : राजकारणात मतभेद असले, तरी मनभेद असू नये असं म्हणतात. परस्परविरोधी विचारधारा असणारे नेते सभागृहात एकमेकावर तुटून पडताना दिसतात. पण तेच सभागृहाबाहेर त्यांच्यात खेळीमेळी, मैत्रीच नातं दिसून येतं. महाराष्ट्राच्या विधिमंडळात सभागृहाबाहेर हे चित्र अनेकदा दिसलय. सभागृहात परस्परांचे विरोधक असलेले नेते सभागृहाबाहेर अनेकदा हास्य-विनोदामध्ये रमलेले दिसले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाची तशी परंपराच आहे. त्यामुळे राजकीय विरोध, मतभेद एका मर्यादेपलीकडे कधी जाऊ नये.

महाराष्ट्राच्या राजकारणात असाच एक प्रसंग घडलाय, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतची जुनी मैत्री आठवली.

एकनाथ शिंदे सध्या कुठे आहेत?

जितेंद्र आव्हाड यांनी लगेच त्या बद्दल टि्वट करुन मुख्यमंत्र्यांबद्दल वाटणारी काळजी, आपली चिंता व्यक्त केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला सतत लोकांमध्ये दिसतात. विविध ठिकाणचे दौरो, कार्यक्रमांमध्ये ते व्यस्त असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या आपल्या मूळगावी सातारा येथे गेले आहेत.

‘मुख्यमंत्री होण्यापूर्वी आपले अतिशय जवळचे स्नेहाचे संबंध’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल साताऱ्याला जाण्यासाठी निघाले, त्यावेळी हवामान खराब होतं. म्हणून वैमानिक जायला तयार नव्हता, पण आपण हट्टाने उड्डाण घेण्यासाठी सांगितलं, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. “आपण मुख्यमंत्री होण्यापूर्वी आपले अतिशय जवळचे स्नेहाचे संबंध होते” असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी टि्वटमध्ये काय म्हटलय?

“मा. मुख्यमंत्री साहेब आपल्यामध्ये राजकीय मतभेद जरूर आहेत. मी हे विसरू शकत नाही की, आपण मुख्यमंत्री होण्यापूर्वी आपले अतिशय जवळचे स्नेहाचे संबंध होते. काल आपण हट्टाने हॅलिकॉप्टरचा पायलट नाही म्हणतं असताना, त्याला हवामान खराब असल्याचे सांगितले जात असतांना देखिल बळजबरीने त्याला हॅलिकॉप्टरने गावी जाण्यासाठी उड्डाण घेण्यास सांगितले. आपण हॅलिकॉप्टर साताऱ्याला उतरवलत नंतर आपण कुठे गेलात हे मला माहीत नाही. पण हवामान खराब असतांना कधिही हॅलिकॉप्टर उडवू नये हे जागतिक अलिखित संकेत आहेत. आपण हे का केलेत ते मला माहित नाही. पण, हे असं करणं महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि आपल्या वैयक्तिक दृष्टीने चुकीचे आहे. “सर सलामत तो पगडी पचास” अशी एक म्हण प्रचलित आहे. आपण अशी भूमिका घेणे किंवा असा हट्ट धरणे हे मला वैयक्तिकरित्या पटलेले नाही. कारण कोणी काहिही म्हणो आपण एकेकाळचे चांगले मित्र होतो. ह्या नात्यानेच मी हे लिहीत आहे. असे पुन्हा कधिही करू नका”