Gopichand Padalkar : आमदार असून तुम्ही कायदा पाळत नाही, सर्वसामान्य नागरिकाने केली गोपीचंद पडळकरांची बोलती बंद VIDEO
Gopichand Padalkar : एका सर्वसामान्य नागरिकाने आमदार गोपीचंद पडळकर यांची बोलती बंद केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एरवी गोपीचंद पडळकर आपल्या विरोधकांवर तुटून पडतात. आक्रमक टिका, टिप्पणी करतात.

भाजपं आमदार गोपीचंद पडळकर नेहमी चर्चेत असतात, ते त्यांच्या वक्तव्यांमुळे. आक्रमक वक्तव्य ही गोपीचंद पडळकर यांची ओळख आहे. बऱ्याचदा गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यांवरुन वाद होत असतात. गोपीचंद पडळकर आपल्या विरोधकांवर तुटून पडतात. गोपीचंद पडळकर सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. सध्या सांगली जिल्ह्याच्या राजकारणात जयंत पाटील त्यांचे मुख्य विरोधक आहेत. पवार कुटुंबावरही ते आक्रमकपणे हल्लाबोल करतात. यावरुन बऱ्याचदा वादही झाले आहेत. बारामतीमधूनही त्यांनी निवडणूकही लढवली होती. विरोधकांवर तुटून पडणाऱ्या या गोपीचंद पडळकरांची एका सर्वसामान्य नागरिकाने बोलती बंद केली. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
नेहमी आपल्या आक्रमक वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे आमदार गोपीचंद पडळकर यांना एका सर्वसामान्य नागरिकाने भररस्त्यात जाब विचारला. गाडीच्या एचएसआरपी नंबर वरून जाब विचारल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच वायरल देखील झाला आहे. भर रस्त्यामध्ये चालत्या गाडीतच पडळकर यांना एका सामान्य नागरिकाने त्यांच्या गाडीला नंबर का नाही? असं विचारलं. यावर पडळकरांनी मराठी अक्षरात नंबर प्लेट असल्याचा उत्तर दिलं. मात्र आमदार असून तुम्ही कायदा पाळत नाही असा प्रतिसवाल करत पडळकर यांची बोलती बंद केली. तसचं पडळकर आणि त्यांच्या चालकांनी सीट बेल्ट देखील लावलं नसल्याचं निदर्शनास आणून दिल्याचा व्हिडिओमध्ये समोर आलं आहे. नागरिकांकडून प्रश्नांची सरबती सुरू झाल्यावर पडळकरांनी व्हिडिओ बंद करायला देखील लावला. पडळकर हे त्यांच्या झिरो झिरो सेवन नंबरच्या गाडी मधून जात असताना ही व्हिडीओ एका नागरिकाकडून करण्यात आला आहे.
आपला लेक मुख्यमंत्री झाला आहे
मागे एका कार्यक्रमात बोलताना गोपीचंद पडळकर म्हणालेले की, “मला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही म्हणून अजिबात तोंड बारीक करु नका, संघर्षाचे दिवस आता संपले आहेत. आपलं सरकार आलंय” “आपला लेक मुख्यमंत्री झाला आहे. आता ज्यांना संघर्ष करायचा आहे, त्यांना संघर्ष करू द्या, परंतू विरोधक देखील संघर्ष करण्याच्या स्थितीत राहिलेले नाहीत” अशी टीका भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीतील आटपाडी येथे केली.