मोठी बातमी! वैष्णवीचा पती शशांक हगवणेचा पाय खोलात, आणखी एक मोठं प्रकरण समोर

मोठी बातमी समोर येत आहे, वैष्णवी हगवणेचा पती शशांक हगवणे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून, आता एक नवं प्रकरण समोर आलं आहे, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मोठी बातमी! वैष्णवीचा पती शशांक हगवणेचा पाय खोलात, आणखी एक मोठं प्रकरण समोर
| Updated on: May 29, 2025 | 6:04 PM

पुण्यातील विवाहीत तरुणी वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली, वैष्णवीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिचा पती शशांक हगवणे, दीर सुशील हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना अटक केली आहे.

दरम्यान आज वैष्णवीचा पती, सासू आणि नणंदेची पोलीस कोठडी संपल्यानं पुन्हा एकदा पोलिसांकडून त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टानं त्यांना आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, तर दुसरीकडे वैष्णवीचा सासरा आणि दीर पोलीस कोठडीत आहे, बुधवारी त्यांच्या पोलीस कोठडीत 31 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

वैष्णवी हगवणेचा पती शशांक हगवणेचं आणखी एक प्रकरण आता समोर आलं आहे. त्यामुळे शशांकच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शशांक हगवणे याने जेसीबी व्यवहार प्रकरणी 11 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रशांत येळवंडे यांनी फसवणुकीचा आरोप केला आहे. या प्रकरणात आता महाळुंगे चाकण इथं गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

25 लाख रुपयांमध्ये जेसीबीचा सौदा ठरला होता.  त्यानुसार प्रशांत एळवंडे यांनी सुरुवातीला 5 लाख रुपये शशांक याला दिले. बँकेचे हफ्ते भरण्यासाठी दरमहा 50 हजार रुपये शशांकला ते  देत होते. मात्र शशांकने हफ्ता भरला नसल्याने बँकेने जेसीबी जप्त केला. शशांकने हा जेसीबी सोडवून आणला, मात्र प्रशांत यांनी दिलेले पैसे परत केले नाहीत. ही रक्कम 11 लाख 70 हजार रुपये आहे, तसेच आपल्याला बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोपही   प्रशांत एळवंडे यांनी केला आहे.

येरवडा कारागृहात रवानगी 

दरम्यान वैष्णवी हगवणे प्रकरणात न्यायालयानं वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. तर वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे पोलीस कोठडीत आहेत.