प्रणिती शिंदे यांच्या प्रचार रॅलीत थेट शाहरुख खानची एण्ट्री? पहा व्हिडीओ

| Updated on: Apr 19, 2024 | 1:54 PM

सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या प्रचार रॅलीत चक्क बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानसारखा दिसणारा व्यक्ती चर्चेत आला. त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती.

प्रणिती शिंदे यांच्या प्रचार रॅलीत थेट शाहरुख खानची एण्ट्री? पहा व्हिडीओ
प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी पोहोचला डुप्लीकेट शाहरुख
Image Credit source: Twitter
Follow us on

जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीच्या उत्सवाला आज सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली. देशातील 19 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 102 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. तर दुसरीकडे दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठीचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे गुरुवारी अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. सोलापूरमधील काँग्रेस उमेदवार आणि आमदार प्रणिती शिंदे यांनीसुद्धा शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या प्रचार रॅलीत चक्क शाहरुख खानसारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. प्रणिती शिंदेंच्या प्रचारासाठी शाहरुखच रॅलीत अवतरला की काय, असा प्रश्न अनेकांना पडला. त्याचे हावभाव, दिसणं हे हुबेहूब किंग खानसारखेच होते. त्यामुळे सर्वजण पेचात पडले होते. मात्र प्रचार रॅलीत काँग्रेसने डुप्लीकेट म्हणजेच शाहरुखसारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीला आणलं होतं.

सध्या सोशल मीडियावर या प्रचार रॅलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये काळ्या टी-शर्ट आणि जीन्स अशा लूकमध्ये हा डुप्लीकेट शाहरुख पहायला मिळतोय. त्याची हेअरस्टाइल, दिसणं, हातवारे हे शाहरुखसारखेच आहेत. त्यामुळे प्रणिती शिंदेंच्या प्रचारासाठी चक्क शाहरुख आला की काय, अशी चर्चा रंगली. सोलापुरात निवडणुकीच्या प्रचारात आलेल्या या डुप्लीकेट शाहरुखला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

सोलापुरात आमदार राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे असा सामना होत आहे. त्यामुळे ही लढाई माजी मुख्यमंत्र्यांची कन्या विरुद्ध ऊसतोड कामगाराचा मुलगा अशी आहे. हाच मुद्दा अधोरेखित करून आमदार राम सातपुते यांनी प्रचार केला होता. प्रणिती शिंदे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे सध्या 6 कोटी 60 लाख 70 हजार 402 रुपयांची संपत्ती आहे. 2019 च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत पाच वर्षांनी 1 कोटी 81 लाख 42 हजार 192 रुपयांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या नावे एकही दुचारी, चारचाकी नसल्याचंही नमूद केलं आहे.