
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही यासंबंधी लोकसभेत किंवा जाहीर सभांमध्ये आरोप केला आहे. त्याच मुद्यावरून आजची पत्रकार परिषद होती. यावेळी खासदार संजय राऊत आणि संजय राऊतही उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप केला. एकामागोमाग एक आकडेवारी सादर करत त्यांनी प्रश्नांची सरबत्तीच केली. महाराष्ट्राच्या निवडणुकीचा आम्ही सविस्तर अभ्यास केलाय, तिथे हेराफेरी झाली आहे. महाराष्ट्रातील मतदार यादी आणि व्होटिंग पॅटर्न आम्ही तपासला. त्यात अनेक तफावत दिसून आली, अनियमितता आढळून आली असा आरोप राहुल गांधी यांनी केला. पाच वर्षे नाही, पाचच महिन्यात मतदारांची लाट, एवढे मतदार कसे वाढले असा खडा सवालही त्यांनी उपस्थित केला.
काय म्हणाले राहुल गांधी ?
महाराष्ट्रात विधानसभेत 2019 आणि लोकसभा 2024 मध्ये 32 लाख मतदार मतदार ॲड झाले. म्हणजे पाच वर्षात34 लाख मतदार वाढले. मह पाच वर्षाच्या तुलनेत पाच महिन्यात एवढे मतदार कसे वाढले. हो लोक कोण आहेत? असा सवाल त्यांनी विचारला. या निवडणुकीत हिमाचल प्रदेशातील लोकसंख्ये एवढे मतदार वाढले. महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या तुलनेत मतदार कसे वाढले. महाराष्ट्राची लोकसंख्या 9 कोटी 54 लाख. मग मतदार त्यापेक्षा अधिक कसे वाढले, निवडणुकीपूर्वी एवढे मतदार कसे आले ? पाच महिन्यात सात लाखापेक्षा अधिक मतदार आले. विधानसभेत ३९ लाख नवीन मतदार आले कसे?असा खड़ा सवाल उपस्थित करत हेराफेरी झाल्याचा आरोप राहुल गांधीनी केला.
ज्या मतदारांची नावे वगळण्यात आली ते दलित, मुस्लिम आणि आदिवासी समाजातील आहेत, असा आरोप राहुल गांधींनी केला. आम्ही याबाबत निवडणूक आयोगाला विचारलं. पण त्यांनी आजतागायत काहीच उत्तर दिलेलं नाही, असेही राहुल गांधी म्हणाले. मी डेटा दिला . महाराष्ट्रातील तीन महत्त्वाचे विरोधी पक्ष म्हणून आम्ही विचारत आहोत. हे मतदार वाढले कसे? निवडणुकीत पारदर्शकता ठेवण्याची जबाबदारी आमची नाही, तुमची आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली.
प्रौढ मतदारांपेक्षा राज्यात अधिक मतदार कसे ?
पाच वर्षात जेवढे मतदार मतदार यादीत ॲड केले होते. त्यापेक्षा जास्त मतदार महाराष्ट्रात पाच महिन्यात अॅड झाले. 32 लाख मतदार 2019 ते 2024 दरम्यान ॲड झाले. विधानसभेत 39 लाख मतदार ॲड झाले. हिमाचल प्रदेशातील लोकसंख्ये एवढे आहेत. हे मतदार कोण आहेत. कुठून आले, असे अनेक सवाल उपस्थित करत राहुल गांधींनी हल्ला चढवला.
सरकारी आकडेवारी नुसार महाराष्ट्राची प्रोढ मतदारसंघ्या 9.54 कोटी आहे. निवडणूक आयोगाच्या मते 9.7 कोटी मते महाराष्ट्रात आहे. म्हणजे महाराष्ट्रात प्रौढ मतदारांपेक्षा अधिक मतदार आहेत, ते कसे काय असा चोख सवालही त्यांनी विचारला.