Congress Mla | धक्कादायक! नाशिक-पुणे मार्गावर काँग्रेस आमदाराच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न

| Updated on: Aug 11, 2023 | 1:54 PM

Congress Mla | हा काँग्रेस आमदार कुठे चाललेला? या आमदाराच नाव काय? काँग्रेस आमदार राजेश राठोड यांनी त्यांना आलेला भयानक अनुभव सांगितला. राजेश राठोड यांनी व्हिडीओ प्रसारित करुन ही माहिती दिली.

Congress Mla | धक्कादायक! नाशिक-पुणे मार्गावर काँग्रेस आमदाराच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न
Congress mla Rajesh Rathore
Follow us on

मुंबई : काँग्रेस आमदाराने त्याला जीवानिशी संपवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. हा आमदार महाराष्ट्र विधान परिषदेवर काँग्रेसच प्रतिनिधीत्व करतो. तीन वर्षांपूर्वी काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर पाठवलं आहे. राजेश राठोड असं या आमदाराच नाव आहे. नाशिक-पुणे मार्गावर राजेश राठोड यांच्या वाहनावर ट्रक घालण्याचा प्रयत्न झाला. ते मुंबईहून जालन्याकडे चालले होते. त्यावेळी त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला. वेल्हे ते पिंपळनेर भिवंडी हद्दीत ही घटना घडली.

राजेश राठोड यांनी व्हिडीओ प्रसारित करुन ही माहिती दिली. राजपूत भामटा बोगस जात प्रमाणपत्र प्रकरण राजेश राठोड यांनी लावून धरले होते. राजेश राठोड यांना करणी सेनेकडून काही दिवसांपूर्वी धमकी देण्यात आली होती.

राजेश राठोड यांनी सांगितला धक्कादायक अनुभव

“मुंबई येथून नाशिकमार्गे औरंगाबाद-जालना प्रवासाला सुरुवात केली. वेल्हे ते पिंपळनेर दरमयान ट्रॅफीक जाम असतं. वाहनामध्ये असताना, एका मोठा टँकर ट्रक त्याचा नंबर संबंधित पोलिसांना देणार आहे. अचानक भरधाव ट्रक माझ्या गाडीवर चालून आला. पाच ते सहा मिनिटाचा पाठलाग करुन गाडी आडवी लावून उभी केली. तेव्हा समजलं की, तो साधा प्रवास करणारा ट्रक नव्हता. त्याच्या बोलण्यातून शंका आली. गेल्या काही दिवसापासून धमक्या येत आहेत. मला घातपाताची शक्यता वाटते. पोलीस, सरकार, गृहविभागाने ताताडीने चौकशी करावी, याची अधिकची माहिती मी द्यायला तयार आहे, सरकारने तातडीने उपायोजना करणं आवश्यक आहे” असं आमदार राजेश राठोड म्हणाले.

त्यांच्याकडे पोलीस संरक्षण होतं

धमकी आल्यानंतर आमदार राजेश राठोड यांनी पोलीस सुरक्षा देण्यात आली होती. राजेश राठोड हे काँग्रेसचे युवा आमदार आहेत. ते जालना जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत. एनएसयूआयपासूनच ते काँग्रेसमध्ये सक्रिय होते.