Dhule News : धुळे दगडफेक प्रकरण, पोलिसांकडून सांगवी गावात रुट मार्च

बॅनरच्या वादातून धुळ्यातील सांगवीत दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यानंतर गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एसआरपीएफची एक तुकडीही गावात तैनात करण्यात आली आहे.

Dhule News : धुळे दगडफेक प्रकरण, पोलिसांकडून सांगवी गावात रुट मार्च
धुळ्यातील सांगवीत पोलिसांकडून रुट मार्चImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 6:08 PM

मनिष मसोळे, टीव्ही 9 मराठी, धुळे / 11 ऑगस्ट 2023 : सांगवीजवळ चरणापाडा येथे गावातील बॅनर फाडण्यावरून झालेल्या वादातून काल गावात दंगल निर्माण झाली होती. यावेळी दोन गटात जोरदार राडा झाला आणि तुफान दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत दोन्ही गटाच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अथक प्रयत्नांनी रात्री पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर सांगवी गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांसह एसआरपीएफची एक तुकडीही गावात तैनात करण्यात आली आहे. पोलिसांच्या वतीने गावात रूट मार्च करत गावात शांतता ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दुसरीकडे दंगलखोरांना इशारा देखील देण्यात आला आहे.

धुळ्यात नेमकं काय घडलं?

आदिवासी दिनानिमित्त चरणपाडा गावात शुभेच्छांचा बॅनर लावण्यात आला होता. हा बॅनर अज्ञाताने फाडला. मात्र या बॅनर फाडल्याप्रकरणी गावातील दोन गटात वाद झाला. पाहत पाहता वाद विकोपाला गेला आणि दगडफेक सुरु झाली. हळूहळू गावात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करु लागले. मात्र परिस्थिती आणखीन चिघळत गेली.

संतप्त जमावाने पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक सुरु केली. इतकेच नाही घटनास्थळी समजूत काढण्यासाठी आलेल्या आमदार काशीराम पावरा यांच्या गाडीवरही दगडफेक केली. या घटनेत 15 पोलिसांसह तीन नागरिक जखमी झाले. यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज, अश्रू धुराचा वापर करत मोठ्या प्रयत्नाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. यानंतर गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करत करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?.
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार.
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना.
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.