बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचा वादात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची एन्ट्री; म्हणाले, लाथ मारायची आणि..

बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचा वादात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची एन्ट्री झाली आहे. या प्रकरणावरून हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट शिंदे गटावर टीका केली.

बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचा वादात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची एन्ट्री; म्हणाले, लाथ मारायची आणि..
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 19, 2026 | 1:40 PM

शिंदे गटाचे प्रवक्ते शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याने वातावण तापलं आहे.  शायना एनसी यांच्या विरोधात ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शायना एनसी यांनी माफी मागितल्यानंतर ठाकरे गटाने आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे.  आता या वादात काँग्रेसने उडी घेतली आहे. या प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिंदे गट आणि शायना एनसी यांच्यावर टीका केली आहे.  लाथ मारायची आणि पाया पडायची असा हा प्रकार आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली.

शायना एनस यांच्यावर टीका करताना सपकाळ म्हणाले, ‘लाथ मारायची आणि पाया पडायची असा हा प्रकार आहे. मुळात गद्दार सेनेकडून आपण दुसरी काय अपेक्षा करणार. सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राबाबत त्यांची जी आगपाखड आहे. एकीकडे विकृती तर दुसरीकडे गद्दारी.. ही या पक्षाच्या रोमारोमांमध्ये भिनलेली आहे. याचाच प्रत्यय महाराष्ट्राला आलाय. सोनिया गांधी यांच्या पुस्तकात विरोध करण्यासारखं काय आहे, तुमचा विरोध का आहे. त्यात काही चुकीच्या घटना आहेत का? आक्षेपार्ह काय लिहिलेलं आहे. सावरकरांनी माफीनामे मागितले, हे सर्वत्र आहे. सावरकर पेन्शन इंग्रजांकडून घेत होते’.

Loading...

मायक्रो फायनान्सवर सपकाळ म्हणाले, ‘मायक्रो फायनान्स कंपन्या, सावकार शेतकऱ्यांना वेठीस धरत असतील.तर सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे.  सरकार नावाचा विषय अस्तित्वात राहिला नाही,कायदा कायद्याचं काम करत नाही.  महाराष्ट्राचा गृह विभाग पांडू हवलदार की घाशीराम कोतवाल चालवतो एवढेच मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं’.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी भाष्य केलं. सपकाळ म्हणाले, ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, असं उपासनात्मक म्हटलं जायचं. उदार होऊन भोपळा ही हाती दिला नाही, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना पाच हजार रुपये देऊन थट्टा चालवली आहे, शेतकऱ्यांना अद्याप सानुग्रह अनुदान मिळालेलं नाही. अमित शाह दोन दिवस पुण्याला आले, मात्र त्यांनी मित्र पक्षासोबत केवळ फुगड्या खेळायचं काम केलं. हात हलवत आले आणि हात हलवत गेले.  संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे आणि हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान मिळाले पाहिजे ही आमची मागणी आहे. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आम्ही रान उठवू . जर सरकारने मदत दिली नाही, तर मंत्र्यांना आणि सत्ताधारी आमदारांना फिरू देणार नाही. सरकार केवळ भ्रष्टाचारांमध्ये मग्न आहे, झाडखाऊ मुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटले आहे’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us