AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे बंधूंच्या आंदोलनात काँग्रेस सहभागी होणार, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील लढा आणखी मोठा होणार!

उद्धव ठाकरेंचे चार तारखेला मुंबईला आंदोलन आहे. या जनआंदोलनात काँग्रेस सहभागी राहणार आहे. लोकशाहीची दिवसाढवळ्या हत्या कर केली जात आहे. ज्ञानेश कुमार हे भाजपाला फायदा पोहोचवत आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

ठाकरे बंधूंच्या आंदोलनात काँग्रेस सहभागी होणार, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील लढा आणखी मोठा होणार!
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 30, 2026 | 9:05 PM
Share

 नितीन कुथे, टीव्ही 9 मराठी, भंडारा : देशभरात मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात संताप व्यक्त केला जातोय. विरोधकही एकवटले असून त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली जातेय. हीच मागणी घेऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मनसेचे प्रमुख राज ठाकरे येत्या 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत आंदोलन करणार आहेत. उद्धव ठाकरेंनी या आंदोलनासाठी जोमाने तयारीला लागा, असा आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिलाय. सोबतच त्यांनी अन्य विरोधी पक्षांनीही आमच्या या मोर्चाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केलेय. या आवाहनानंतर आता राज्यातील काँग्रेसने मोठा निर्णय घेतलाय. काँग्रेस उद्धव ठाकरे, राज ठाकरेंच्या या मोर्चाला पाठिंबा देणार आहे.

लोकशाहीला वाचवण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार

याबाबतची माहिती काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दिली. ते भंडारा जिल्ह्यात बोलत होते. लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार आहे. मुंबईतील उद्धव ठाकरेंच्या 4 ऑक्टोबरच्या जनआंदोलनात आम्ही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभागी होऊ, असे त्यांनी सांगितले. ही लढाई सुरुवातीपासूनच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी लढत आहेत. निवडणूक आयोगाचे प्रमुख ज्ञानेश कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांतर्फे मनमानी केली जात होती. एकतर्फी निर्णय घेण्याची त्यांची भूमिका होती. त्याचा सरळ फायदा भाजपाला होत होता, असा आरोप राहुल गांधींनी केला.

आम्ही आंदोलनात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी होणार

उद्धव ठाकरेंचे चार तारखेला मुंबईला आंदोलन आहे. या जनआंदोलनात काँग्रेस सहभागी राहणार आहे. लोकशाहीची दिवसाढवळ्या हत्या कर केली जात आहे. ज्ञानेश कुमार हे भाजपाला फायदा पोहोचवत आहेत. लोकशाही वाचली पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे. ही लढाई काँग्रेसच लढत आहे. जे जे लोकशाहीला मानणारे लोक आहेत ते सगळेच आता रस्त्यावर उतरू लागले आहेत. हे आंदोलन फक्त पक्षापुरते न राहता ते एक जनआंदोलन व्हावे अशी अपेक्षा काँग्रेस पक्षाची आहे. चार तारखेला होणाऱ्या आंदोलनात काँग्रेस प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सहभागी होणार आहे, अशी भूमिकाही नाना पटोले यांनी व्यक्त केली.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...