Gudi Padwa 2022 : सोनं खरेदी करण्यासाठी जळगावच्या सुवर्णनगरी मध्ये ग्राहकांची गर्दी

| Updated on: Apr 02, 2022 | 1:42 PM

आज गुढीपाडव्यानिमित्त (Gudi Padwa 2022) सोने खरेदी करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर जळगावच्या (Jalgaon) सुवर्णनगरीत सोने (Gold) खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. साडे तीन मुहूर्तापैकी एक मानला जाणाऱ्या गुढीपाडव्याचे सणाचे औचित्य साधून जळगाव सुवर्णनगरी ग्राहकांनी फुलली आहे.

Gudi Padwa 2022 : सोनं खरेदी करण्यासाठी जळगावच्या सुवर्णनगरी मध्ये ग्राहकांची गर्दी
ग्राहकांमध्ये उत्साह
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जळगाव – आज गुढीपाडव्यानिमित्त (Gudi Padwa 2022) सोने खरेदी करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर जळगावच्या (Jalgaon) सुवर्णनगरीत सोने (Gold) खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. साडे तीन मुहूर्तापैकी एक मानला जाणाऱ्या गुढीपाडव्याचे सणाचे औचित्य साधून जळगाव सुवर्णनगरी ग्राहकांनी फुलली आहे. दोन वर्षात कोरोनाच्या काळात एकही सण कोरोनाच्या संसगामुळे साजरा करता आला नव्हता. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात कमी आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून लागू केलेली नियमावली मागे घेण्यात आली आहे. दोन वर्षानंतर गुढीपाडव्याचा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे.

निर्बंध शिथिल झाल्याने सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा उत्साह

साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडवा सणानिमित्त सोनं खरेदी करण्यासाठी जळगाव सुवर्णनगरी मध्ये ग्राहकांची गर्दी आहे. गेली दोन वर्ष कोरोना प्रादुर्भावामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांना सोनं खरेदी करता आली नाही मात्र यावर्षी निर्बंध शिथिल झाल्याने सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा उत्साह पाहायला मिळत आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोना खरेदी करण्याची परंपरा

कसदार सोनं म्हणून ओळख असलेल्या जळगाव सुवर्णनगरीमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोना खरेदी करण्याची परंपरा आहे. पारंपारिक सोन्याचे दागिने त्यामध्ये पेशवाई कंठी हार, मंगळसूत्र, कानातले या सह विदेशी दागिन्यांची खरेदी केली जाते. तसेच आज बाजारात व्हरायटी देखील उपलब्ध आहे. त्यामुळे महिला वर्गांमध्ये आजच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्यासाठी उत्साह असल्याचे ग्राहक विद्या पाटील यांनी सांगितले.

ग्राहकांना सोनं खरेदी करण्याची संधी मिळाली

गेले दोन वर्ष कोविडचे नियम होते. मात्र या वर्षी नियम कमी झाल्याने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांना सोनं खरेदी करण्याची संधी मिळाली आहे. सोन्याच्या भावात काही प्रमाणात घट झाल्याने याचा देखील ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने या मुहूर्तावर सोने खरेदी केल्यास बरकत राहते अशी अनेकांची श्रद्धा आहे. त्यामुळे आज जळगाव सुवर्णनगरी ग्राहकांनी फुलली आहे असं सोन्याचे व्यापरी आकाश भंगाळे यांनी सांगितलं.

विद्यावाचस्पती नको, डॉक्टरच शब्द ठीक आहे, मराठी भाषा भवनाच्या कार्यक्रमात Ajit Pawar यांची टोलेबाजी

CM Uddhav Thackeray: भाषा शिकणं गुन्हा नाहीये, पण मातृभाषेचा न्यूनगंड असता कामा नये; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ठणकावले

Watermelon : उन्हाळी हंगामातील हुकमी पीक, दोन वर्षाच्या नुकसानीनंतर धाडस केलेले शेतकरी यंदा मालामाल