CM Uddhav Thackeray: भाषा शिकणं गुन्हा नाहीये, पण मातृभाषेचा न्यूनगंड असता कामा नये; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ठणकावले

मराठी भाषेबाबत बोलण्यापेक्षा मराठी भाषेत बोला. भाषेवरून आमच्यावर टीका झाली. आताही होतेय. त्या टीकेला मी किंमत देत नाही. टीका करणारे काय किंमतीचे आहेत मला माहीत आहे.

CM Uddhav Thackeray: भाषा शिकणं गुन्हा नाहीये, पण मातृभाषेचा न्यूनगंड असता कामा नये; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ठणकावले
भाषा शिकणं गुन्हा नाहीये, पण मातृभाषेचा न्यूनगंड असता कामा नये; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ठणकावलेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 1:22 PM

मुंबई: मराठी भाषेबाबत बोलण्यापेक्षा मराठी भाषेत बोला. भाषेवरून आमच्यावर टीका झाली. आताही होतेय. त्या टीकेला मी किंमत देत नाही. टीका करणारे काय किंमतीचे आहेत मला माहीत आहे. त्यामुळे मी किंमत देत नाही. शिवसेनाप्रमुखांवर (balasaheb thackeray) टीका झाली होती. हे मराठी (marathi) भाषेबद्दल बोलतात आणि यांची नातवंड इंग्रजी शाळेत शिकतात, अशी टीका करण्यात आली होती. आमची मुलं इंग्रजी शाळेत शिकली. पण शिवसेना प्रमुखांनी पहिल्या दिवशी सांगितलं होतं इंग्रजी शाळेत आणि मराठी घरात असली पाहिजे. मॉम, डॅड इकडे चालणार नाही. आजोबाला आजोबाच बोललो पाहिजे. फार तर आज्या म्हणा. माझी दोन्ही मुलं इंग्रजी बोलतात. हिंदी बोलतात आणि मराठीही बोलतात. भाषा शिकणं हा गुन्हा नाहीये. दुसऱ्या भाषेचा द्वेष करायचा नसला तरी मातृभाषेचा न्यूनगंड असता कामा नये, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मराठी भाषा भवनाच्या मुख्य केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, मराठी भाषा विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. मातृभाषेच्या मंदिराचं भूमिपूजन करत आहोत. त्याची सुरुवात करत आहोत. त्याबद्दल आनंद आहे. अनेकदा अशा गोष्टी होतात आयुष्य पुढे जात असतं. अनेक जबाबदाऱ्या येत असतात. त्या आपल्याला पार पाडाव्या लागतात. काही काही जबाबदाऱ्या अशा असतात की आयुष्याचं सार्थक झालं असं वाटत असतं. त्यातील ही माझ्या आयुष्यातील मोठी घटना आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

यापेक्षा जीवनाचे सार्थक असूच शकत नाही

मुंबईसाठी आजोबा लढले, मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्याचे काम शिवसेनाप्रमुखांनी केले. आज मुख्यमंत्री म्हणून माझे नाव या इमारतीच्या भूमिपूजनाच्या पाटीवर लागले यापेक्षा माझ्या जीवनाचे दुसरे सार्थक असूच शकत नाही, असंही ते म्हणाले.

जगभरातील पर्यटक आले पाहिजे

मराठी भवन बघण्यासाठी जगभरातील पर्यटक आले पाहिजेत असं करणार आहोत. जगभरात अनेक भाषा बोलल्या जातात. पण आपल्या मातृभाषेचं भवन कसं असलं पाहिजे हे जा आणि मुंबईत जाऊन बघून या असं इतर देशांनी म्हटलं पाहिजे. मुंबईत येणारा प्रत्येक पर्यटक इथं आलाच पाहिजे. मराठीचं वैभव आणि श्रीमंत त्याला समजली पाहिजे. या भाषेतील खजिना काही औरच आहे असं त्याला वाटलं पाहिजे. इतर भाषेचा मला द्वेष नाही. मराठी शिकवली गेली पाहिजे, मराठीत फलक लावला पाहिजे हा कायदा करावा लागतो. ही वेळ कुणी आणली. मराठीबाबत बरंच बोलता येईल. ही आपली मातृभाषा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

अत्याचार कदापि सहन करणार नाही

राज्यात मराठी शिकली पाहिजे हा अत्याचार नाही, दुकानाच्या पाट्या इथं मराठीत असल्याच पाहिजेत. पण आपण जेंव्हा असा आग्रह धरतो आणि यामुळे ज्यांच्या पोटात दुखते त्यांच्या पोटदुखीचा उपचार करावाच लागेल. अटकेपार मराठी भाषेचा झेंडा नेणाऱ्या मराठी राज्याच्या राजधानीत मराठी भाषेला पुसण्याचं काम कुणी केलं तर त्याला धडा शिकवण्याची ताकत मराठी भाषेत आहेत. हे अत्याचार कदापि सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

असं असेल मराठी भाषा भवन?

  1. मराठी भाषेचा विकास आणि संवर्धन करण्यासाठी मरीन ड्राईव्ह येथील प्रस्तावित मराठी भाषा भवन चर्नी रोडला समुद्र किनारी उभे राहणार आहे. प्रकल्पाची जागा चर्नी रोड येथील समुद्राभिमुख भूखंडावर असेल.
  2. हे स्थळ मरीन ड्राइव्हच्या समोर आहे आणि पश्चिमेला महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद आणि पूर्वेला सावित्रीदेवी फुले महिला वसतीगृहाने वेढलेले आहे. जागेची लांबी अंदाजे 54 मीटर आणि रुंदी सरासरी 32 मीटर असेल.
  3. मराठी भाषा भवन हे (G+7) तळमजला अधिक सात मजल्याचे असून त्यात तळघर देखील असेल. त्याची लांबी 39 मीटर आणि रुंदी सुमारे 22 मीटर असेल.
  4. संकल्पनेनुसार पहिल्या मजल्यावर एक खुले सार्वजनिक मंच असेल. इथे मरीन ड्राईव्हच्या लोकांना थेट प्रवेश करता येईल. मरीन ड्राईव्हपासून या मंचापर्यंत पायऱ्यांची मालिका जाईल.
  5. इमारतीचे दुसरे प्रवेशद्वार उत्तरेकडील मोकळ्या जागेतून दिलेले आहे जिथून जिना आणि लिफ्टमध्ये प्रवेश करणे शक्य आहे.
  6. इमारतीमध्ये 200 आसन क्षमतेचे बहुउद्देशीय सभागृह, 145 क्षमतेचे अॅम्फी थिएटर, चार मजल्यांवर प्रदर्शनासाठी जागा आणि एक मजला प्रशासकीय आणि कार्यालयीन जागा असेल.
  7. चार मजल्यांच्या प्रदर्शन दर्शिकेला चार विभागांमध्ये वर्गीकृत केले आहे. मराठी भाषेचा इतिहास आणि तिच्या उत्क्रांतीचा प्रवास इथे बघता येणार आहे.
  8. या दर्शिकेतील प्रदर्शनात विशेष तयार केलेले चलचित्रपट, त्रिमितीय प्रतिमा (होलोग्राम्स) आणि छायाचित्रांच्या प्रती असतील.
  9. अंदाजे 50 फूट/35 फूट महाराष्ट्राचा नकाशा लक्ष वेधुन घेणारा ठरेल.
  10. हा नकाशा भाषेच्या उत्क्रांतीत योगदान देणाऱ्या सर्व प्रतिष्ठित विजेते आणि व्यक्तिमत्त्वांच्या स्थानांचे चित्रण करेल.
  11. हा नकाशा अभ्यागतांकडून त्यांच्या मूळ स्थानासह प्रत्येक वैयक्तिक संकेतस्थळ आणि व्यक्तिमत्त्वाचा सखोल अभ्यास करण्यासाठी डिजीटल पद्धतीने वापरता येईल.
  12. दर्शिकेच्या 4 मजल्यापैकी 3 मजले तांब्याच्या धातुपासून तयार केलेल्या जाळीने वेढलेले असणार आहे. यासाठी खास मराठी लिपीच्या अक्षरांच्या रचनेतून ही जाळी तयार करण्यात येणार आहे.
  13. इमारतीमध्ये 200 क्षमतेचे सभागृह आहे आणि ते तळघरात बांधलेल्या भागात असेल.
  14. इमारतीच्या मागील बाजूस बहुमजली वाहनतळ प्रस्तावित आहे.
  15. प्रकल्पाचे एकूण बांधकाम क्षेत्र अंदाजे 6583 चौ.मी. (70,858 चौ. फूट) एवढे असेल.

संबंधित बातम्या:

विद्यावाचस्पती नको, डॉक्टरच शब्द ठीक आहे, मराठी भाषा भवनाच्या कार्यक्रमात Ajit Pawar यांची टोलेबाजी

Gudi padwa: ढोलताश्यांचा दणदणाट ते शोभायात्रा, राजकीय नेत्यांचा गुढी पाडवा सोहळा जल्लोषात!

Gudi Padawa : शेतकरीही साधतो पाडव्याचा मुहूर्त, काय आहे सालगड्याची परंपरा? वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.