Gudi Padawa : शेतकरीही साधतो पाडव्याचा मुहूर्त, काय आहे सालगड्याची परंपरा? वाचा सविस्तर

शेती व्यवसायामध्ये रुढी-परंपरांना अधिकचे महत्व आहे. पेरणीचे असो की पीक काढणी मुहूर्त साधूनच शेतकरी शेती कामे करीत असतो. अशीच एक परंपरा ही सालगड्याची आहे. मराठी नववर्षाच्या याच दिवसापासून शेतकऱ्यांचेही शेती व्यवसयातील नववर्ष सुरु होते. रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच या नववर्षीची सुरवात केली जाते. मराठी नववर्षाच्या प्रारंभी ग्रामीण भागात आजही सालगडी ठेवण्याची प्रथा कायम आहे.

Gudi Padawa : शेतकरीही साधतो पाडव्याचा मुहूर्त, काय आहे सालगड्याची परंपरा? वाचा सविस्तर
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 12:34 PM

वाशिम :  (Farming) शेती व्यवसायामध्ये रुढी-परंपरांना अधिकचे महत्व आहे. पेरणीचे असो की पीक काढणी मुहूर्त साधूनच शेतकरी शेती कामे करीत असतो. अशीच एक परंपरा ही (Farm Labour) सालगड्याची आहे. (New Year) मराठी नववर्षाच्या याच दिवसापासून शेतकऱ्यांचेही शेती व्यवसयातील नववर्ष सुरु होते. रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच या नववर्षीची सुरवात केली जाते. मराठी नववर्षाच्या प्रारंभी ग्रामीण भागात आजही सालगडी ठेवण्याची प्रथा कायम आहे. शेतीतील दैनंदिन कामे व जनावरांची काळजी घेण्यासाठी शेतमालक सालगड्याची नेमणूक करतात. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सालगडी संबंधीत शेतमालकाकडे कामावर रुजू होण्याची प्रथा वाशीम जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही कायम आहे. पुर्वी सालगड्यांचे वार्षिक वेतन सरासरी पन्नास हजार असायचे मात्र बदलत्या अर्थ चक्रामुळे आजघडीला सालगड्याचे वार्षिक वेतन लाखाच्या घरात पोचले आहे.

अशाप्रकारे ठरविला जातो सालगडी

सालगडी म्हणजे वर्षभर मजूराने शेतकऱ्याच्या शेतामध्ये राबायचं. यापूर्वी धान्य आणि काही रकमेवर सालगडी हे काम करण्यास तयार असत. मात्र, बजलत्या परस्थितीनुसार धान्य न घेता पैशामध्ये वाढ करण्यात आली. पाडव्याच्या दिवशी ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये काम करायचे आहे तो शेतकरी, मजूर आणि गावतील काही प्रतिष्ठित नागरिक समोर येऊन सालगड्याची सालभराची मजुरी ठरवित असत. मजूर आणि शेतकऱ्याच्या सहमतीने व्यवहार ठरला तर सर्वाच्या साक्षीने मजूरास पैसे दिले जात होते. आता शेतकरी आणि मजूर यांच्यामध्येच व्यवहार होत आहे.

परंपरा कायम मात्र, सालगड्याच्या मजूरीत वाढ

काळाच्या ओघात शेती व्यवसयामध्ये अमूलाग्र बदल झाला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी काही परंपरा या बदलत्या वातावरणामध्येही कायम ठेवलेल्या आहे. त्यापैकीच एक म्हणजे ही याच पाडव्याच्या दिवशी सालगडी ठरवला जातो. वर्षभरासाठी सालगड्यास किती पैसे दिले जाणार हे ठरवले जाते आणि आजपासूनच कामालाही सुरवात केली जाते. पूर्वी 40 ते 50 हजारवर सालगडी ठरविला जात होता. पण दलत्या अर्थ चक्रामुळे आजघडीला सालगड्याचे वार्षिक वेतन लाखाच्या घरात पोचले आहे.त्यामुळं शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वजा करून सालगड्यासाठी पैसा आणायचा कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांना गरज मदतीची

वाढता उत्पादन खर्च आणि उत्पादित झालेल्या शेतमालाला मिळणारे दर यामध्ये मोठी तफावत असल्याने शेतकरी आधीच मेटाकुटीस आले आहेत. त्यातही वाढत असलेली यंत्रिकीकरण त्यामुळं शेतकऱ्यांनी शेती करायची तरी कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळं शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन हा वसा पुढे नेल्यास शेती व्यवसाय फायद्याचा व्हायला वेळ लागणार नाही यात मात्र शंका नाही. मात्र, अशा स्वरुपात कोण समोर येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे.

संबंधित बातम्या :

Rabi Season : पीक पदरात आता चिंता जनावरांच्या चाऱ्याची, ज्वारीपेक्षा कडब्याला अधिकचा दर

Rabi Season : हंगामाच्या अंतिम टप्प्यात स्प्रिंक्लरचाच आधार, पाणीसाठा मुबलक तरीही शेतकरी का आहे त्रस्त?

Weather Update: सूर्य आग ओकतोय, 121 वर्षात जे घडलं नाही ते यंदाच्या मार्चमध्ये अनुभवयाला मिळाले

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.