AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rabi Season : पीक पदरात आता चिंता जनावरांच्या चाऱ्याची, ज्वारीपेक्षा कडब्याला अधिकचा दर

रब्बी हंगामात यंदा ज्वारीचे क्षेत्र घटले असले तरी जनावरांच्या चाऱ्यासाठी ज्वारीचा पेरा हा केलाच जातोच. यंदा पीक पध्दतीमधील बदलाचे परिणाम थेट ज्वारीच्या दरावर आणि जनावरांसाठी आवश्यक असलेल्या कडबा दरावर देखील पाहवयास मिळणार आहे. वाढत्या उत्पादनामुळे आणि ज्वारीचे भाव दरवर्षी कमी असल्याने शेतकऱ्यांना ज्वारीची चिंता नाही पण जनावरांसाठी आवश्यक असलेल्या कडब्यासाठी शेतकऱ्यांची भटकंती ही सुरु आहे. कारण सध्या ज्वारीपेक्षा अधिकचा दर हा कडब्याला आहे. ज्वारी ही 2 हजार क्विंटल तर कडब्याला 2 हजार 500 रुपये शेकडा असा दर आहे.

Rabi Season : पीक पदरात आता चिंता जनावरांच्या चाऱ्याची, ज्वारीपेक्षा कडब्याला अधिकचा दर
रब्बी हंगामातील ज्वारी काढणीला सुरवात. शेतकऱ्यांकडून कडबा चाऱ्याची साठवणूकImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 02, 2022 | 11:07 AM
Share

नांदेड :  (Rabi Season) रब्बी हंगामात यंदा ज्वारीचे क्षेत्र घटले असले तरी जनावरांच्या चाऱ्यासाठी ज्वारीचा पेरा हा केलाच जातोच. यंदा पीक पध्दतीमधील बदलाचे परिणाम थेट (Sorghum Crop) ज्वारीच्या दरावर आणि जनावरांसाठी आवश्यक असलेल्या (Animal Fodder) कडबा दरावर देखील पाहवयास मिळणार आहे. वाढत्या उत्पादनामुळे आणि ज्वारीचे भाव दरवर्षी कमी असल्याने शेतकऱ्यांना ज्वारीची चिंता नाही पण जनावरांसाठी आवश्यक असलेल्या कडब्यासाठी शेतकऱ्यांची भटकंती ही सुरु आहे. कारण सध्या ज्वारीपेक्षा अधिकचा दर हा कडब्याला आहे. ज्वारी ही 2 हजार क्विंटल तर कडब्याला 2 हजार 500 रुपये शेकडा असा दर आहे. सध्या मराठवाड्यातील ज्वारीची काढणी तर झालेली पण शेतकरी आता कडब्याची जुळवाजुळव करीत आहे. वाढत्या उन्हामध्ये शेतकरी आता ज्वारीपेक्षा चारा पिकांवर भर देत आहे.

ज्वारीपेक्षा कडब्याला अधिकची मागणी

मराठवाड्यातील नागरिकांचे ज्वारी हे जरी मुख्य खाद्य असले तरी काळाच्या ओघामध्ये यामध्ये बदल होत आहे. कारण आता ज्वारीपेक्षा गव्हाला अधिकची मागणी आहे. असे असले तरी ज्वारीचा सर्वाधिक फायदा म्हणजे यापासून मिळणारा कडबा. कडबा हा ज्वारीच्या पेंढ्या असतात. उन्हाळी हंगामात ज्वारीची काढणी झाली की पावसाळ्यापर्यंत कडबा हाच जनावरांसाठी चारा असतो. हीच परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. पण आता ज्वारीचे क्षेत्र घटल्याने कडब्याला अधिकचे महत्व आले आहे. सध्या ज्वारीपेक्षा कडब्याला अधिकची मागणी आहे. कडब्याची एक पेंढी 20 ते 25 रुपयांना विकली जात आहे. तर दुसरीकडे ज्वारी ही 20 रुपये किलोने विक्री होत आहे.

यामुळे ज्वारीच्या पेऱ्यात घट

खरिपात कापूस आणि रब्बी हंगामात ज्वारी हे मराठवाड्यातील मुख्य पीक होते. मात्र, आता ज्वारीची जागा हरभऱ्याने घेतली आहे तर खरिपात सोयाबीनच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. ज्वारी पेरणीपासून ते काढणीपर्यंत अथक परिश्रम आणि उत्पन्न कमी ही अवस्था आहे. त्यामुळे शेतकरी हे नगदी पिकावर भर देत आहेत. यंदाच्या हंगामात तर ते अधिक तीव्रतेने समोर आले आहे. ज्वारीला पाणी, मशागत, काढणी, मोडणी आणि त्यानंतर मळणी करावी लागते. इथपर्यंत संपले असे नाहीतर पुन्हा कडबा गोळा करुन त्याची गंज लावावी लागते. एवढे करुनही बाजारपेठेत सरासरी 2 हजारापर्यंतचा दर. केवळ जनावरांसाठी कडबा लागतो म्हणून ज्वारीच्या पेऱ्यावर भर दिला जात असल्याचे चित्र आहे. यंदा क्षेत्रातच घट झाल्याने दरात वाढ होईल असा अंदाज आहे.

संबंधित बातम्या :

Weather Update: सूर्य आग ओकतोय, 121 वर्षात जे घडलं नाही ते यंदाच्या मार्चमध्ये अनुभवयाला मिळाले

Rabi Season : हंगामाच्या अंतिम टप्प्यात स्प्रिंक्लरचाच आधार, पाणीसाठा मुबलक तरीही शेतकरी का आहे त्रस्त?

Drip Irrigation : सरकारचा एक निर्णय अन् लाखो शेतकऱ्यांचा फायदा, उत्पादनवाढीसाठी काय आहे धोरण?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.