कलिना कॅम्पसमधील मुलींच्या हॉस्टेलमध्ये 40 जणींना विषबाधा, चौकशीची युवासेनेची मागणी

| Updated on: Apr 21, 2024 | 11:41 AM

मुंबई विद्यापीठातील कलिना कॅम्पसमधील नूतन मुलींच्या वसतीगृहामध्ये ( हॉस्टेल) 40 हून अधिक विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याचे प्रकरण समोर आल्याने खळबळ माजली. याप्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेतर्फे करण्यात आली.

कलिना कॅम्पसमधील मुलींच्या हॉस्टेलमध्ये 40 जणींना विषबाधा, चौकशीची युवासेनेची मागणी
Follow us on

मुंबई विद्यापीठातील कलिना कॅम्पसमधील नूतन मुलींच्या वसतीगृहामध्ये ( हॉस्टेल) 40 हून अधिक विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याचे प्रकरण समोर आल्याने खळबळ माजली. याप्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेतर्फे करण्यात आली.
या विद्यार्थिनींना झालेली विषबाधा पालिकेकडून होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे झाली की तेथे लावण्यात आलेल्या वॉटर कुलरची स्वच्छता न राखल्यामुळे झाली याची चौकशी करावी अशी मागणी करणारे निवेदन युवासेनेकडून पाठवण्यात आले आहे. कुलगुरु प्रा.(डॉ.) रविंद्र कुळकर्णी यांना ई मेल द्वारे हे निवेदन पाठवून चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

तसेच युवासेना पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन आढळलेल्या त्रुटींची माहिती दिली. त्यानुसार येथील पाण्याची तपासणी करण्यात आली असून त्यांचा रिपोर्ट सोमवारी दिला जाणार आहे

या वसतिगृहातील पाच पैकी फक्त तीनच कुलर वापरात आहेत. मात्र उर्वरीत दोन कूलर अजून अजुन कार्यान्वित नाही तर ते दोनही कुलर तातडीने वापरासाठी घेण्याच्या सूचना अभियंता विभागास देण्यात आल्या आहेत. शिवाय विद्यार्थ्यांना तातडीने औषधोपचार मिळावा यासाठी किमान एक डॉक्टर आरोग्य केंद्रात उपलब्ध असावा, अशी व्यवस्था करण्यात यावी अशा उपाय योजना तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले. युवासेना माजी सिनेट सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन वॉर्डन डॉ. मधुरा कुलकर्णी तसेच अभियंता आणि विषबाधा झालेल्या विद्यार्थिनींची भेट घेतली.