
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या असून या निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपाने धमाकेदार कामगिरी या निवडणुकीत केली. भाजपानंतर शिवसेना शिंदे गट दुसऱ्या नंबरचा मोठा पक्ष महापालिकेच्या निवडणुकीत ठरला. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीचे मतदान काल झाले. सर्वच राजकीय पक्षांकडून या निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आयोजित सभा रद्द केल्या. अजित पवार यांचे निधन झाल्याने म्हणाव्या तसा प्रचार कोणत्याच राजकीय पक्षांनी केला नाही. मुंबईहून बारामतीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारसभेसाठी येत असतानाच अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, ज्यामुळे त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला.
काल अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली. उद्या म्हणजेच 9 जानेवारी 2026 रोजी निकाल आहे. मात्र, यादरम्यान एक धक्कादायक प्रकार पुढे आला. सोलापुरातील मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन धाब्यावर सापडल्याचा हैराण करणारा प्रकार पुढे आला. एका धाब्यावर ईव्हीएम मशीन सापडल्याने राष्ट्रवादीचे उमेश पाटील आक्रमक झाले.
या घटनेनंतर घटनास्थळी निवडणूक अधिकारी सीमा होळकर तसेच पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दोन्ही ईव्हीएम मशिन्स ताब्यात घेतल्या. त्या दोन ईव्हीएम मशीन अतिरिक्त असून त्यावर कोणतेही मतदान झाले नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र, ईव्हीएम मशीन चक्क धाब्यावर मिळाल्याने खळबळ उडाली.
दरम्यान उमेश पाटलांच्या आक्षेपानंतर दोन्ही मशीन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेत रीतसर पंचनामा करुन स्ट्रॉंगरूममध्ये ठेवण्यात आल्या. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या समोर पंचनामा करत या मशिन्स ठेवण्यात आल्यात. यादरम्यान अनेक लोक देखील समजले होते. काल मतदानावेळी अनेक मतदार केंद्रात ईव्हीएम मशिन बंद पडल्याचे बघायला मिळाले. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींवर कोण राज करणार हे उद्या स्पष्ट होईल.