नागपुरात अक्षरश: मृत्यूचं तांडव, दिवसभरात तब्बल 113 रुग्णांचा मृत्यू, कोरोनाचं प्रचंड थैमान

नागपूर जिल्ह्यातील अक्षरक्ष: मृत्यूचं तांडव सुरु आहे (113 corona postive patient death in nagpur).

नागपुरात अक्षरश: मृत्यूचं तांडव, दिवसभरात तब्बल 113 रुग्णांचा मृत्यू, कोरोनाचं प्रचंड थैमान
प्रातिनिधीक फोटो
चेतन पाटील

|

May 20, 2021 | 11:04 PM

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील अक्षरक्ष: मृत्यूचं तांडव सुरु आहे (113 corona postive patient death in nagpur). जिल्ह्यातील परिस्थिती आता हाताबाहेर गेली आहे. नागपूर जिल्ह्यात दिवसभरात तब्बल 113 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काळजाला चीर पाडणारा हा भयावह आकडा आहे. कोरोनाबाधितांचा वाढत्या आकड्यांसोबत मृत्यूचा वाढता आकडाही चिंता वाढवणारं आहे. नागपुरात आज दिवसभरात तब्बल 7 हजार 374 नवे रुग्ण आढळले. तर 5097 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी परतले.

नागपुरातील भयान वास्तव

नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने बेड मिळणंही कठीण होऊन बसलं आहे. अनेक रुग्णांना उपचासाठी बेड मिळावा यासाठी कोव्हिड हॉस्पिटलबाहेर तीन ते चार दिवस वाट पाहावी लागत असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय दररोज 60 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होतोय. जिल्ह्यातील कोरोना स्थिती ही हाताबाहेर गेल्याचं स्वत: पालकमंत्री नितीन राऊत यांनी मान्य केलंय.

नागपुरातील निर्बंध अजून कडक होणार

नागपूरमध्ये कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेऊन पालकमंत्री नितीन राऊत यांनी विरोधी पक्षाला सोबत घेऊन काही महत्त्वपूर्ण कामं करण्याचं ठरवलं आहे. याबाबत त्यांनी स्वत: आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. नागपुरात RT-PCR चाचण्यांचा वेग वाढवण्यासाठी उपाययोजना केली जाईल. नागपुरातील 23 हॉटेल्सना कोवीड केअर सेंटरची परवानगी देण्यात आली आहे. तसंच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर निशुल्क अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिल्याचंही नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्याचबरोबर नागपुरातील अत्यावश्यक दुकाने दुपारी 1 वाजेपर्यंत सुरु ठेवा, अशा सूचनाही राऊत यांनी मनपा आयुक्तांना दिल्या आहेत. त्याचबरोबर नागपुरातील निर्बंध अजून कडक होणार असल्याचे संकेतही नितीन राऊत यांनी दिले आहेत.

वर्धा इथं 1 हजार बेडचं रुग्णालय उभारलं जाणार

ऑक्सिजनचा तुटवडा झाल्यामुळे हाहा:कार माजलाय. अशावेळी लॉयड स्टीलकडे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आहे. त्यामुळे वर्धा इथल्या लॉयड स्टील प्लांटच्या बाजूला 1 हजार बेडचं रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती राऊत यांनी दिलीय. लॉयड स्टीलमधून ऑस्किजन आणला जाऊ शकत नाही. त्यामुळे या कंपनीच्या बाजूलाच रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतल्याचं राऊत यांनी सांगितलं.

अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना परिस्थिती भयानक

अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसतेय. अनेक ठिकाणी मृत्यूचं प्रमाण वाढताना दिसतंय. यवतमाळमध्ये दिवसभरात तब्बल 37 रुग्णांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे एका रुग्णाचा चक्क बेड अभावी मृत्यू झाला. या रुग्णाचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यात 21 तर चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबई शहरात तब्बल 57 रुग्णांचा मृत्यू झाला,

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें