Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : महाविद्यालये एक फेब्रुवारीपासून सुरू होणार

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचं समोर आलं आहे.

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : महाविद्यालये एक फेब्रुवारीपासून सुरू होणार
Corona testing
| Edited By: | Updated on: Jan 26, 2022 | 12:52 AM

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात दिवसभरात आढळून येणाऱ्या कोरोनाचा रुग्णांची संख्या 40 हजारांच्या खाली आली आहे. सोमवारी राज्यात 28 हजार 286 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 36 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 21 हजार 941 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 75 लाख 35 हजार 511 वर गेलीय तर आतापर्यंत 70 लाख 89 हजार 936 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 1 लाख 42 हजार 151 जणांच्या मृत्यूंची नोंद झालीय. तर,राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 2845 वर पोहोचली आहे. तर, 1454 जण ओमिक्रॉन संसर्गातून मुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. सोमवारी राज्यात 86 ओमिक्रॉन बाधितांची नोंद झालीय. त्यामध्ये सर्वाधिक 47 रुग्ण नागपूर तर 28 रुग्ण पुण्यात  आढळले आहेत.