पालघरमध्ये नवजात बाळाला कोरोनाची लागण, आईची चाचणी मात्र निगेटिव्ह

| Updated on: Jun 01, 2021 | 9:29 AM

नुकतंच एका नवजात बालकाला कोरोनाची लागण झाली आहे. पालघर जिल्ह्यात याबाबतची घटना समोर आली आहे. (Palghar New Born Baby tested Corona Positive)

पालघरमध्ये नवजात बाळाला कोरोनाची लागण, आईची चाचणी मात्र निगेटिव्ह
new born baby
Follow us on

पालघर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होतो ना होतो आता तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका अधिक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतंच एका नवजात बालकाला कोरोनाची लागण झाली आहे. पालघर जिल्ह्यात याबाबतची घटना समोर आली आहे. त्यामुळे सर्वांचे धाबे दणाणले आहेत. (Palghar New Born Baby tested Corona Positive)

नवजात बालकाला कोरोनाची लागण

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडवली आहे. कोरोनाग्रस्त मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या लाटेचा कहर थांबत नाही, तोच तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत. पालघरमधील सफाळे येथील टेकरीचा पाडा या ठिकाणी राहणाऱ्या एका नवजात बालकाला कोरोनाची लागण झाली आहे.

आईची चाचणी निगेटिव्ह

पालघरमधील जन्माला आल्यानंतर 12 तासाने एका नवजात बालकाला कोरोना अँटिजेन टेस्ट करण्यात आली. यावेळी त्याच्या आईचीही चाचणी करण्यात आली. मात्र आईची अँटीजेन चाचणी निगेटिव्ह आली आहे. तर बाळाची अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

बाळाची प्रकृती स्थिर

सध्या या बालकाची आई पालघर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. तर नवजात बाळाला जव्हार येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या या बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

दरम्यान पहिल्यांदा अशाप्रकारे एका नवजात बाळाला कोरोना झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे हे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच या घटनेमुळे आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत.

तिसरी लाट रोखण्यासाठी संकल्प

दरम्यान, दुसऱ्या लाटेचा आपण चांगला मुकाबला केला असला तरी कोविडचे आव्हान कायम आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी आपण कोविडमुक्त गावाचा संकल्प करून देशासाठी एक उत्तम उदहारण घालून द्या असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

राज्यात काल 15,077 नवीन रुग्णांचे निदान

राज्यात काल 15,077 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात काल दिवसभरात 184 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूदर हा 1.66 टक्के एवढा झाला आहे. राज्यात काल 15,077 नवीन रुग्ण सापडल्यानंतर सद्यस्थितीत एकूण 2,53,367 सक्रिय रुग्ण आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 57,46,892 झालीय. (Palghar New Born Baby tested Corona Positive)

संबंधित बातम्या : 

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आता गावकऱ्यांनी पुढे यावे, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

बालरोग तज्ज्ञांना ट्रेनिंग, गृहभेटींवर भर; कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी महापालिकेचा अ‍ॅक्शन प्लान